26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeसोलापूरतरूणाला मारहाण, दोघांवर गुन्हा

तरूणाला मारहाण, दोघांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : महिलेला मारहाण करत असताना सोडवण्यासाठी गेलेल्या विनोद प्रकाश उपलंची (वय ४०, रा. बालाजी व्हिला गोंधळे वस्ती, अक्कलकोट रोड) याच्या डोक्यात दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध उपलंची यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

फिर्यादी विनोद गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ऊर्मिला शिंदे यांच्या घरी कामानिमित्त गेले होते. त्यावेळी शिव्या देण्याच्या कारणावरून आरोपी प्रशांत नलवडे हा महिलेला मारहाण करत होता. विनोद उपलंची हे मध्यस्थी करण्यासाठी गेल्यानंतर आरोपी प्रशांत याने तू कोण आहे बे मध्ये पडणारा, तुला खल्लास करतो, असे म्हणत त्याच लाकडाने विनोद

याला मारहाण केले. तेव्हा आरोपी संजय नलवडे याने खल्लास कर असे म्हणत असतानाच विनोद उपलची याच्या डोक्यात प्रशांत याने डोक्यात मोठा दांडका घातला. यामुळे तो चक्कर येऊन पडला, अशा आशयाची फिर्याद विनोद उपलंची यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक नरेश कामुर्ती हे करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या