सोलापूर : केंद्र सरकारच्या गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर चूल पेटवून भाकऱ्या थापल्या.
शहरात गॅस सिलिंडर दरवाढीविरुद्ध रोज आंदोलने होत आहेत. आम आदमी पक्षाचे विभागीय संघटनमंत्री अॅड. सागर पाटील आणि कार्यकर्ते शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर जमले. येथेच एक चूल मांडली. या चुलीवर तवा ठेवला. चिपाटे घालून चूल पेटविली. यावेळी आपच्या महिला संघटक अश्विनी गायकवाड
आम पार्टीच्या आंदोलनात विमला पवार या ज्येष्ठ महिला बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशात आल्या होत्या. पवार यांनीही जिल्हा परिषदेच्या गेटसमोर बसून भाकरी तयार केल्या. गॅस परवडत नाही. त्यामुळेच तर चूल पेटवावी लागली. सिलिंडर काही कामाचा राहिला नाही, असे त्या म्हणाल्या.
आपचे सागर पाटील म्हणाले, मागील सरकारच्या काळात गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानंतर स्मृती इराणी यांनी आंदोलन केले होते. तत्कालीन पंतप्रधानांना बांगड्या पाठवू असे म्हणाल्या होत्या. आता स्मृती इराणी केंद्रात मंत्री आहेत. पण त्या गॅस सिलिंडर दरवाढीवर बोलायला तयार नाहीत. आज त्यांच्यासाठी बांगड्या आणल्या आहेत. या बांगड्या आम्ही पोस्टाने स्मृती इराणी यांच्या घरी पाठविणार आहोत.
आजूबाजूला थांबलेले कार्यकर्ते सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते.
यावेळी जाधव, प्रसाद बाबानगरे, रहीम शेख, मेहमूद गब्बुरे, मल्लिकार्जुन पिलगेरी, नितीन गायकवाड जैनोद्दीन शेख उपस्थीत होते.