19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeसोलापूरअब्दुल सत्तार म्हणजे ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’; शरद कोळींची घणाघाती टीका

अब्दुल सत्तार म्हणजे ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’; शरद कोळींची घणाघाती टीका

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे फक्त एकनाथ शिंदे असतील. निवडणूक आयोग शिंदे गटाला चिन्ह देईल असा गौप्यस्फोट केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

यावर युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अब्दुल सत्तार यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले आहे.
‘अब्दुल सत्तार म्हणजे उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’. शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण देण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर सोपवली आहे. निवडणूक आयोगाने जर पक्षपात करत निर्णय दिला तर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील. राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे. ते सोलापूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

शिंदे गट आणि निवडणूक आयोग यांनी जर ५० खोके एकदम ओके कार्यक्रम केला तर महाराष्ट्र राज्यात दंगल उसळेल. राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा आहे. त्यांचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने जर एकनाथ शिंदे गटाला दिले तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या