सोलापूर : एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवून नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केल्याची घटना घडल्याने तरूणावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून महेश देवकर(रा. गंगेवाडी, ता. दक्षिण सोलापूर) याच्यावर जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित मुलगी शहरातील एका कॉलेजमध्ये शिकत असून तिला दैनंदिन तपासणीसाठी तिच्या आईने डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी मुलगी गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दील्यावर पीडीतेला विचारपूस केल्यानंतर पीडितेने आरोपी महेश देवकर याने कॉलेज सुटल्यानंतर जवरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवून अज्ञातस्थळी नेऊन दुष्कर्म केल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महेश देवकर याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.