23.6 C
Latur
Saturday, January 28, 2023
Homeसोलापूरअल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला सात वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला सात वर्षे सक्तमजुरी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शेतात गवतासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी यातील आरोपी परमेश्वर तुपे यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी साक्षी, पुराव्याच्या आधारे सात वर्षांची सक्तमजुरी सुनावली पाच हजारांचा दंडही सुनावला.

पीडित मुलगी ही शेतामध्ये गवत कापण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर दुस-या वेळीही असेच कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने आरडाओरडा केल्याने तो तेथून पळून गेला. त्यानंतर आरोपीचा भाऊ परसराम तुपे याने कुणाला सांगशील तर खल्लास करेन, अशी धमकी दिली. याचदरम्यान तिथे पीडितेचे वडील आले. त्यांनी संबंधित प्रकार पाहिला. तेव्हा आरोपी पळून गेले. यानंतर मंद्रूप पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली.

या खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडिता, तिचे वडील, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, तपासिक अंमलदार, उपविभागीय अधिकारी अभय डोंगरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. माधुरी कुलकर्णी, अ‍ॅड. गंगाधर रामपुरे, बळे यांनी, तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. नागेश खिचडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद, पीडितेचे वयाबाबतचे पुरावे सिद्ध झाले. पीडिता व तिच्या वडिलांचा जबाब, वैद्यकीय पुरावा या सर्व एकमेकांशी संलग्न पुराव्यांवरून आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या