26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरपंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू

पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : कर्नाटकातील बेळगाव मधील अंनगुळ येथील पाच भाविक सेल्टोस गाडीने पंढरपूर कडे येत असताना रविवारी पहाटे कासेगाव फाटा (ता. पंढरपूर) येथे अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातात अभिजीत हुंबरे (वय २८, रा. अंनगुळ ता. बेळगाव), गीतेश पोकशेकर (वय २६, रा. अंनगळ ता. बेळगाव), राजकवि कृष्णा मधुकर (वय २३, रा. अंनगुळ ता. बेळगाव) हे भाविक जखमी झाले आहेत. तर राजू संभाजी शिधोळकर (वय ४५, रा. अंनगुळ, ता. बेळगाव), परशुराम संभाजी जवरूचे (वय ५० रा. अंनगुळ ता. बेळगाव) हे भाविक मयत झाले आहेत. मयत भाविकांबाबत त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहेत. तसेच जखमी भाविकांवर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या