22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसोलापूरढग पिंपरी ते बार्शी 20 किमी फरफटत नेऊन अपघात

ढग पिंपरी ते बार्शी 20 किमी फरफटत नेऊन अपघात

एकमत ऑनलाईन

बार्शी : येथील उपळाई रोड येथे दि.15 जून रोजी रात्री 8 ते 9 वा.दरम्यान एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नग्न अवस्थेत पडल्यामुळे त्या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.बघता बघता वार्ता संपूर्ण शहरभर पसरली त्यामुळे हा खून आहे की अपघात असा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.त्यानंतर घटनास्थळी पोलिस कर्मचारी दाखल झाले अन शोध घेयला सुरवात झाली.रात्री उशिराने पोलिस तपासात उपळाई रोड येथे मृत्यु झालेल्या व्यक्तीचा अपघात झाला असल्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल ननवरे यांनी दुरध्वणीद्वारे सांगितले.अधिक माहिती अशी की अपघातात मृत्यु झालेला व्यक्ती बिभीषण सूर्यभाण बागल वय-55 वर्षे परांडा तालुक्यातील ब्रम्हगावचा असून सकाळी तो दुस-याच्या शेतात कामाला गेला होता.परंतू रात्री उशिरादेखील तो परत न आल्याने शेतमालक यांच्याकडे त्याच्या भावाने विचारपूस केली तेंव्हा 5 वाजताच बिभीषण निघून गेल्याचे सांगितले.

त्यानंतर मयताच्या भावांनी शोध सुरु केला असता ढग पिंपरी येते आले असता त्यांना भावाच्या पायातील चप्पल व गमजा ,रक्ताचे डाग,मांसाचे तुकडे व रक्ताने माखलेला टायरचा वण रोडवर दिसला.त्यानंतर शोध घेत बार्शी रोडने पुढे आले असता भगव्या रंगाचा शर्ट पडलेला दिसला.शर्ट पाहून भावाची ओळख झाली.तसेच पुढे मयत बिभीषण यांचे भाऊ मोटार सायकलवर वारदवाडी फाट्याने लक्ष्याच्यावाडी पर्यंत आले.रस्त्यात त्यांना रक्ताचे डाग आणि मांसाचे तुकडे दिसले.लक्षाचीवाडीत आल्यावर बार्शी पोलिस स्टेशन येथे एक बेवारस प्रेत असल्याचे समजले.त्यानंतर मयताचे भाऊ बार्शी पोलिस स्टेशनला आले असता त्यांना प्रेत दाखवल्यावर उजव्या पायाची जखम आणि निळ्या जीन्स पँटवरून मयत भाऊ असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यानंतर मयताचा भाऊ विष्णु सूर्यभाण बागल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात भादवि कलम-304(अ),279,338 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार हे करीत आहेत.

उपळाई रोड येथे अचानक नग्न अवस्थेत मुतदेह आढळून आल्याने शहरात भीती आणि संशयाचे वातावर निर्माण झाले.लोकांमध्ये घात आहे की अपघात आहे असा संभ्रम होता.परंतू पोलिस तपासात तो अपघात असून ब्रम्हगाव येथील व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले.ढग ंिपपरी ते बार्शी पर्यंत एखादा व्यक्ती गाडीने फरफटत कसा आणला असेल असा प्रश्न पुन्हा नागरिकांमधून निर्माण होत असून झालेला सत्य प्रकार काय आहे जाणून घेण्याची नागरिकांची उत्सुकता आहे.
अपघात झालेल्या व्यक्तीला ब्रम्हगाव ते बार्शी अंदाजे 20 किमी फरफटत आणले आहे.त्यामुळे वाटेतील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरु असून,तपास परांडा पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात येत आहे असे सपोनि ज्ञानेश्वर उदार म्हणाले.

तो व्यक्ती परंडा तालुक्यातील ब्रम्हगाव येथील आहे.आम्ही आणखी तपास केलेला नाही.गुन्हा परंडा पोलिस स्टेशनला वर्ग केला जाणार आहे याची पूर्वकल्पना नाही.
-विशाल खांबे,डीवायएसपी,परांडा

आंतरजिल्हा टोळीतील तेरा दुचाकी चोरांना अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या