21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसोलापूरबँकेच्या कामासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

बँकेच्या कामासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर: बँकेच्या कामासाठी सोलापूरहून मोहोळकडे निघालेल्या दुचाकीवरील तरुणाला मालट्रकने कट मारून धडक दिली. या धडकेत डोक्याला जबर मार लागल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोलापूर ते पुणे रोडवरील कोंडी गावाच्या हद्दीत २८ जुलै २०१२ रोजी दुपारी ३.३५ वाजता घडली.

उदयसिंग श्रीमंत कवितके (वय ३४, रा. अनगर, ता. मोहोळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २८ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कोंडी (ता. उ. सोलापूर) शिवारात दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास भरधाव असलेल्या मालट्रक नंबर केए ५६, ०१०९ ने मयत उदयसिंग कवितके यांची दुचाकी एमएच १३, सीएम ९८६४ ला जोराची धडक दिली. या धडकेत उदयसिंगच्या डोक्याला, हाता-पायाला जबर मार लागला. या रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मालट्रक चालकाविरोधात गुन्हा भरधाव दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

कोंडी शिवारात अपघात करुन मालट्रक चालक खबर न देताच तसाच निघून गेल्याची फिर्याद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या अपघातात गाडीचे २० हजारांचे नुकसान झाले. अपघातानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल चालकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यास मदत केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या