25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरघरफोडी गुन्ह्यातील आरोपींना अटक

घरफोडी गुन्ह्यातील आरोपींना अटक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : २ मे रोजी विजापूर नाका पोलिस ठाणे येथे फिर्यादी नामे शरणकुमार इरण्णाकनकी (वय ३१ रा. सोनिया नगर, भिमज्योत तरुण मंडळजवळ, विजापूर रोड, सोलापूर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्र. १९५-२०२१ भादविस कलम ३८० दाखल होता सदर गुन्ह्याचे व कोरोना संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने ३ मे रोजी १२ च्या सुमारास विजापूर नाका पोलिस स्टेशन हद्दीत विजापूर नाका गुन्हे प्रकटीकरण पथक हे पेट्रोलिंग करत असताना जुना विजापूर नाका चौकात एक संशयित इसम निदर्शनास आल्याने पथकाने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याच्या बाबत संशय बळावल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अमोल नागनाथ गायकवाड (वय २८, रा. लिमयेवाडी भैरूवस्ती, मल्लू घोडके यांचे पिठाचे चक्की जवळ, सोलापूर) असे सांगितले.

त्यावेळी त्यांचेकडे एक सॅमसंग ए-३० कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट मिळून आला. सदर मोबाईलची पडताळणी केली असता तो मोबाईल चोरीचा असल्याचे निष्पन्न झाल्याने व सदर बाबत विजापूर नाका पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याने त्यास सदर गुन्ह्याखाली अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने त्याचा साथीदार नामे लक्ष्मणअशोक गायकवाड (वय २३, रा. झोपडपट्टी नं. २ विजापूर रोड, सोलापूर) याच्यासह २६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सोनिया नगर भिमज्योत तरुण मंडळासमोर विजापूर रोड, सोलापूर येथे चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्या साथीदारास अटक करून गुन्ह्यातील चोरी गेलेला मोबाईल, टीव्ही, मिक्सर, तांब्याचा हंडा, कलश व घागर असा एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपआयुक्त डॉ. वैशाली कडूकर, सहा. पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, वपोनि. उदयसिंह पाटील, दुपोनी अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सपोनि. शितलकुमार कोल्हाळ, सफौ संजय मोरे, पोह. शावरसिद्ध नरोटे, राजकुमार तोळणुरे, श्रीरंग खांडेकर, पोना. प्रकाश निकम, आयाज बागलकोटे, पो.कॉ. शिवानंद भिमदे, इम्रान जमादार, अतिश पाटील, अनिल गवसाने, विशाल बोराडे, लखन माळी यांनी केलेली आहे.

आत्मदहन प्रकरणी दोघांना अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या