करमाळा : सात वर्षांची शिक्षा भोगत असताना कोविड काळात पंचेचाळीस दिवस व ६९० दिवस कोरोना काळ अशी पॅरोल रजा मिळवल्यानंतर आरोपी घरी गेला पण माघारी आलाच नाही. त्यामुळे पुण्याच्या येरवडा कारागृहामार्फत करमाळा पोलिस ठाण्यात १४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
करमाळा तालुक्यातील पोलिसांनी त्याचा शोध घेतला तेवहा तो मिरगव्हाण ता. करमाळा येथे साधूच्या वेशात फिरत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यास ताब्यात घेतले. मोतीराम मरिबा ओहोळ रा. मिरगव्हाण असे आरोपीचे नाव आहे.
२०१८ मध्ये बार्शी येथील न्यायालयाने . त्याला सात वर्षे शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यास अटक करून येरवडा कारागृह पुणे येथे पाठवण्यात आले होते. . मिरगव्हाण ता. करमाळा येथील एका प्रकरणात एकाच्या मत्युस जबाबदार असल्याचा गुन्हा त्याच्यावर सिध्द झाला होता.त्याला बार्शी न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड अशी शीक्षा सुनावली होती.ओहोळ याला पुणे येथील येरवडा कारागृृृृहात ठेवण्यात आले होते.कोरोना देशभर पसरला तेव्हा त्याला पॅरोल रजा देण्यात आली होती.