बार्शी : बार्शी सेशन कोर्टाने दिलेल्या निकालात आरोपी गोपाळ उर्फ भैय्या दुर्योधन पाटिल वय वर्षे २१ यास जिल्हा व सत्र न्यायधीश अजितकुमार भस्मे यांनी अल्पवयीन मुलीवर बलत्कार केल्याप्रकरणी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.अधिक माहिती अशी की २५ मार्च २०१८ रोजी अज्ञान पीडिता हिस आरोपी गोपाळने त्याच्या घरी बोलवून पीडितेला मोबाईल दाखवून तिच्यावर अत्याचार केले.
त्यानंतर पीडितेच्या आजोबांनी तिच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणी विचारणा केली असता आरोपीने पीडितेच्या आजोबांना मारहाण केली.त्यानंतर पीडितेच्या आईने कुर्डूवाडी पोलिस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध भा.दं.वि कलम – ३७६,३७६(२),३२३ व बाल लैंगिक अत्याचाराचा कायदा-२०१२ कलम -४,६,८,१२ अन्वये २०१८ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपी हा पीडितेचा नातेवाईक असताना असा प्रकार करण्यात आला होता.यात सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितासाठी १० साक्षीदार तपासण्यात आले.यात फिर्यादीची साक्ष वैज्ञानिक प्रयोग शाळेचा अहवाल,आरोपिच्या घरातून जप्त करण्यात आलेली तेलाची बाटली,सतरंजी जप्त करण्यात आली व त्यासंदर्भाने पंचांच्या साक्षी घेण्यात आल्या.यात पीडितेच्या आजोबांची व आईचीही साक्ष महत्वाची ठरली.
या प्रकरणामध्ये आरोपीने जमिनीच्या आणि विहिरीच्या वादाचा मुद्दा पुढे करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला परंतू विशेष सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी असा कोणताही वाद प्रलंबित नसल्याचे न्यायालयाच्या दृष्टीस आणले.सरकार पक्षाच्यावतीने असा युक्तिवाद करण्यात आला की आरोपिने त्याच्या जवळच्या सदस्याविरुद्ध अमानुष कृत्य केले आहे.हे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.त्यामुळे सरकारी पक्षाचा युक्तिवाद व आरोपीविरुद्ध असलेले सबळ पुरावे याचा विचार करता मा.विशेष जिल्हा न्यायधीश भस्मे यांनी आरोपी यास बाल लैंगिक अत्याचार कायदा-२०१२ यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.यात सरकार पक्षातर्फे ॲड.दिनेश देशमुख यांनी महत्वाची भूमिका बाजावली.यामध्ये कुर्डूवाडीचे पोलीस निरीक्षक ओमासे,पोकॉ बोराडे,शेळके,जगताप यांनी विशेष तपास केला होता.
‘बायडन यांच्याद्वारे अनुच्छेद ३७० पुन्हा लागू होणार’,