सोलापूर : ९ जून रोजी हुमनाबाद येथील एका तरुणीचे १७ तोळे दागिने चोरीला गेले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २४ तासात याचा छडा लावला.
दिलीप उर्फ धनुष्य रामण्णा माने (वय२५ , रा. मंठाळ, बसवकल्याण विदर कर्नाटक) याला शनिवारी एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली.
मरीयम शेख (रा.मुंबई)यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली होती, त्यांचा मंगळवारी विवाह होणार आहे. त्यामुळे १६जून रोजी त्या मुंबईहून हुमनाबादकडे जाताना भिगवण ते सोलापूर मार्गावर त्यांचे दागिने चोरीला गेले होते.माने दागिने विकण्याच्या तयारीत असताना त्याला पुंजाळ क्रीडा मैदान येथून पोलीसांनी ताब्यात घेऊन दागीने जप्त केले होते.