सोलापूर : विश्वहिंदू परिषद बजरंग दलातील गोरक्षकांनी गोतस्करी करणाऱ्या तीन गाड्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करीत ६२ गोवंशांना कत्तलीपासून जीवनदान दिले.
मार्केट यार्ड समोरील महामार्गावर गाडी क्रमांक एम. एच. १३ सी. यू. ५९८६ या गोतस्करी करणाऱ्या गाडीवर जोडभावी पेठ पोलीस ठाणे अंतर्गत गोहत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच रात्री तीनच्या दरम्यान गाडी क्रमांक एम. एच. १३ सी. यू. ६०९५ ही संपूर्ण बॉडी पॅक असलेली पिकअप गाडी गोरक्षकांनी ताब्यात घेऊन ती फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे आणली. गोहत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्या गाडीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती गाडी फौजदार चावडी पोलीस ठाण्यातच लावण्यात आली आहे. तसेच वैराग येथील बजरंग दलातील गोरक्षकांनी धाराशिव येथे गोवंश कत्तलीच्या उद्देशाने नेत असलेली गोतस्करीची गाडी वैराग पोलीस ठाणेअंतर्गत गुन्हा दाखल करून ती गाडी वैराग पोलीस ठाण्यातच लावण्यात आली.
कारवाई यशस्वी करण्याकरिता विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हाध्यक्ष प्रशांत परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष योगिराज जडगोनार, शहराध्यक्ष अविनाश कैय्यावाले, वैराग प्रखंड प्रमुख सत्यवान ताटे, गोरक्षक पवनकुमार कोमटी, अविनाश मदनावाले, पवन बल्ला, विनायक निकते, सूरज भोसले, ओम जगताप, वीरेश मंचाल, प्रवीण यनगल, विवेक बडवे, व्यंकटेश बागल, पंपू पाटील, रोहित देशमुख, गणेश जाधव, सूरज माने आदी गोरक्षकांनी परिश्रम घेतले .