24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसोलापूरअ‍ॅड. आंबेडकरांचा इशारा; पंढरपुरात चोख बंदोबस्त

अ‍ॅड. आंबेडकरांचा इशारा; पंढरपुरात चोख बंदोबस्त

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : राज्याची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करावे, असा इशारा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. आज या मागणीसाठी वंचित आघाडी व विश्व वारकरी सेनेकडून होणा-या आंदोलनाची दखल जिल्हा प्रशासनाकडून गंभीरतेने घेण्यात आली असून विठ्ठल मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून पंढरपूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान एसटी बसची तोडफोड होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पंढरपुरातून जाणा-या व येणा-या सर्व एसटी बस सेवा ३६ तास बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात वारक-यांना योग्य त्या नियम व अटीच्या अधीन राहून भजन-कीर्तन करण्यास परवानगी द्यावी. मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात यावे. त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी चलो पंढरपूर असा नारा देऊन किमान एक लाख वारकरी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचाबाबत जाहीर आवाहन केले आहे.

तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पांिठबा दिला आहे. यामुळे त्यांनी देखील कार्यकर्त्यांना पदाधिका-यांना पंढरपुरात येण्याचे जाहीर आवाहन केले आहे. त्याचबरोबर राज्यातील दोनशेहून अधिक संघटनेच्यावतीने या आंदोलनास पांिठबा देण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील यापूर्वी झालेल्या मोठ्या आंदोलनाचा इतिहास पाहता आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या मागण्यासाठी एसटी बसची तोडफोड केल्याने घटना घडल्या आहेत. राज्यातील इतर भागातून व सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आंदोलन करते या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. शासनाकडून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत विचार होण्यास विलंब झाला तर एसटी बसची तोडफोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एसटी बसची तोडफोड होऊ नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ३० ऑगस्ट दुपारी १२ वाजल्यापासून ते ३१ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पंढरपूर कडे जाणा-या सर्व एसटी बस बंद ठेवण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर यांच्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली होती. त्यामूळे पंढरपुरातून बाहेर जाणा-या व पंढरपुरात येणा-या एस टी बस बंद करण्यात आले आहेत.

सात प्रमुख रस्त्यावर तिहेरी नाकाबंदी
विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करावे या मागणीसाठी उद्या बहुजन वंचित आघाडी आणि विश्ववारकरी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाससाठी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर पंढरपूर जवळच्या माळीनगर मध्ये दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबदारीचा उपाय म्हणून तगडा पोलिस बंदोबस्त लावला आहे. शहरात ५० पोलिस अधिकारी आणि ४०० पोलिस बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत.

आंदोलक शहरात येऊनये यासाठी शहराला जोडणार्या प्रमुख सात रस्त्यावरून तिहेरी नाकाबंदी करण्यात आली आहे. शिवाय मंदिर परिसरातील छोठेमोठे ३० रस्ते देखील बंद करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

लम्पिस्कीन आजार प्रतिबंधासाठी उपचार शिबिराला सुरवात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या