22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeसोलापूरसीबीएसई निकाल लांबल्याने प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

सीबीएसई निकाल लांबल्याने प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

एकमत ऑनलाईन

सोलापूर : दहावीच्या परीक्षेचा निकालानंतर शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेची सोमवारी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी लांबणीवर पडली आहे. सीबीएसई व आयसीएससीचा निकाल निकाल अद्याप लागला नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सोमवारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यालचंद महाविद्यालयात सोमवारी दुपारी शहर आणि जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक आयोजित केली

वालचंद महाविद्यालयात सोमवारी जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश नरेंद्र जोशी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, प्राचार्य संतोष कोटी यांची उपस्थिती होती.

शिक्षण विभागाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच ११ वीच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी पहिली गुणवत्ता जाहीर करण्यात येणार होती.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन १ ऑगस्टला महाविद्यालय सुरु होणार होते, मात्र आता किमान १५ दिवस प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू होणार नसल्याने महाविद्यालयांमध्ये प्रथमच पाऊल टाकणा-या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. सोमवारी गुणवत्ता यादी जाहीर होणार म्हणून अनेकांनी शहरातील विविध महाविद्यालयांकडे चकरा मारल्या.

सीबीएसई व आयसीएससीचा निकाल येत्या १४ जुलै रोजी लागणार आहे. त्या विद्यार्थ्यांवर ११ वीच्या प्रवेशासंबंधी अन्याय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी बाबर यांनी स्पष्ट केले. या बदलानुसार आता नव्याने प्रवेशासाठीचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या