31.8 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमराठवाडातब्बल आठ महिन्यानंतर विठूरायाची आणि भक्तांची झाली भेट

तब्बल आठ महिन्यानंतर विठूरायाची आणि भक्तांची झाली भेट

पाडवा,भाऊबीजेनिमित्त आकर्षक फुलांची सजावट

एकमत ऑनलाईन

पंढरपूर (अपराजित सर्वगोड) : तब्बल आठ महिन्यानंतर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच आजपासून सुरू करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिर समितीने विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मंदिर समितीने भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत दर्शन व्यव्यस्था सुरु ठेवली आहे. तब्बल आठ महिन्यानंतर देवाला भक्तांची आणि भक्तांना देवाची भेट झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून १८ मार्च पासून पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात आले होते.त्यानंतर माघी,चैत्री आणि आषाढी वारी भाविकाविना साजरी करण्यात आली होती. काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मंदावल्याने राज्यातील मंदिरे सुरू करावीत यासाठी अनेक पक्ष व संघटनांनी आंदोलने केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन सर्वांना दिले होते.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पंढरपुरात याची अमलबजावणी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर झाली. याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने बैठक घेवून दर्शनाची व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. दिवसभरात एक हजार भाविकांना सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत काही अंतरावरून विठुरायाचे मुखदर्शन देण्यात येत आहे.

तसेच दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून ऑनलाईन दर्शनाची तारीख वेळ निश्चित करावी लागणार आहे. आणि ज्या भाविकांनी संकेतस्थळवरून दर्शनाची वेळ घेतली आहे.त्याच भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. तसेच भाविकांनी ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन सकाळी ६ ते ७, ८ ते ९,१० ते ११,११ ते १२, दुपारी १२ ते १,२ ते ३,३ ते ४,संध्यकाळी ५ ते ६,७ ते ८ आणि ८ ते ९ या कालावधीत भाविकांना घेता येईल अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. दर्शन दर्शन रांगेत मास्क,योग्य अंतर,सॅनिटायझरचा वापर आदी शासनाच्या सूचनेचे पालन करावे लागणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या