16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeसोलापूरअक्कलकोट ग्रामीण रुग्णालय ‘ऑक्सिजन’वर

अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय ‘ऑक्सिजन’वर

एकमत ऑनलाईन

विश्वनाथ चव्हाण /अक्कलकोट
शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ आणि चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथे निर्माण करण्यात आलेली ग्रामीण रुग्णालयात वर्ग एक,वर्ग दोन चे वैद्यकीय अधिकारी नसल्याने ही रुग्णालय ऑक्सिजनवर असुन या रुग्णालयाची ‘प्रकृती’ दिवसेंदिवस खालावत चालली आहे. येथे येण्यास वैद्यकीय अधिकारी पाठ फिरवत आहे. पाठ का फिरवताहेत, याची सखोल चौकशी करून रुग्णालय पूर्वपदावर आणली पाहिजे. अन्यथा ग्रामीण रुग्णालय बंद पडतील, गरीब व गरजु रुग्णाचे हाल होतील. आमदार साहेब,… लक्ष घाला भांनगड काय आहे.

अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय अधिका-यांची रिक्त पदे आहे. येथे अधिकारी येण्यास धजावत असतो.वैद्यकीय अधिकारी रुजू होतो. पण चार-आठ दिवसांनी रजेवर जातो.पुन्हा ते परत येतच नाही.ग्रामीण रुग्णालयात अशी कोणती आडचण आहे.डॉक्टर थांबत नाही. मिळालेली माहिती अशी की,काही कर्मचा-यांनी बाहेरच्या लोकांना रुग्णालयातील माहिती पुरवणे व त्यांच्यामार्फत त्रास देणे असे प्रकार चालू आहे. त्यामुळे हे वैद्यकीय अधिकारी त्यांच्या त्रासाला कंटाळून येण्यास धजावत असल्याचे ऐकू येते.परंतु नक्कीच भानगड काय हेह्वगुलदस्त्यात आहे.परस्थिती अशीच कायम राहिल्यास ग्रामीण रुग्णालयाचे हाल होतील आणि गरजु व गरीब लोकांचे काय हाल होतील याचे विचार कदाचित कोणी केले नसेल.

आधीपासुन डॉक्टरची संख्या नसतांना डॉ.अशोक राठोड यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला होता.रुजू होताच रुग्णाची सेवा उत्तम व रुग्णालयाच्या परिसरात रम्य वातावरण, रुग्णाच्या नातेवाईकांना बसण्यासाठी बाकडे, झाडे, गार्डन,पाण्याची सोय याबरोबर रुग्णालयात शिजेरियन,ऑक्सिजन, सिसि टीव्ही कॅमेरे असे अनेक सुविधा उपलब्ध करून दिले.राजकीय व सामाजिक असो डॉ.अशोक राठोड यांना कोणीच वाईट म्हणून हिणवले नाही.त्यांच्या कामाचे आदर्श सर्वांनी घेत होते.त्यांच्या प्रमोशन बदलीने प्रत्येक लोकांना खूप दु:ख व वेदना सहन कराव्या लागल्या.

वैद्यकीय अधिका-यांकडून रुग्णाना चांगली सेवा देण्याची मानसिकता आहे.परंतु काही लोकांकडू अंतर्गत त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणूनच वैधकीय अधिकारी कदाचित या रुग्णालयाकडे येण्यास नक्कीच पाठ फिरवले असेल.अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.येथे येण्यास वैद्यकीय अधिकारी का? धजावतो.याचे कारण तालुक्याचे लोकप्रतिनिधीनी शोधावे.ग्रामीण रुग्णालयात दैनंदिन २००ते ३००रुग्णाची पासणी केली जाते.उपचारार्थ वैद्यकीय अधिकारी नसल्याने सिजेरियन करणे बंद असुन वेळेवर प्रसूती होत नाही. सद्यस्थितीत याठिकाणी अधीक्षक, वर्ग एक व वर्ग दोनचे वैद्यकीय अधिकारी नसल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या