27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home सोलापूर अकलूज कडकडीत बंद

अकलूज कडकडीत बंद

एकमत ऑनलाईन

अकलूज – शेतकरी हिताला बाधा आणणाऱ्या कायद्याला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अकलूजकरांनी १०० टक्के प्रतीसाद देत आपले सर्व व्यवहार स्वयंस्फुर्तीने बंद ठेवले.

भाजी मंडई, मेडिकल व दवाखाने वगळता ईतर सर्व दुकाने, व्यावसाय व व्यापार बंद ठेवण्यात आले. बंद पुकारलेल्या दिवसपासुन अकलूज बंद ठेवले जाईल कि नाही यावर ग्रामस्थांकङुन वेगवेगळे तर्क लावले जात होते. सोशल मिङीयावर अनेक तज्ञांनी आपली वेगवेगळी मते मांङली होती. परंतू अकलूजकर नागरीकांनी राजकारण सोङुन शेतकरी हिताला प्राधान्य देत आपले व्यवहार पुर्णपणे बंद ठेवले.

माळशिरस तालुक्यातील माळीनगर, श्रीपुर, वेळापुर, पिलीव, मळोली, माळशिरस, नातेपुते, तांदुळवाङी आदी गावांमध्येही शंभर टक्के बंद पाळण्यात आला. काही पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते नागरीकांना धमकावतील या भितीने सर्वञ चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु कोणताही अनुचित प्रकार तालुक्याच्या कोणत्याही भागात घङला नाही. सर्वसामान्य नागरीकांनी स्वयंस्फुर्बंतीने बंद पाळुन शेतकर्यांप्रती आपली कृतज्ञताच व्यक्त केली.

खाडीमध्ये अडकलेल्या दोन चिमुरड्यांना जीवदान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या