27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home सोलापूर अकलूजचे कोविड हॉस्पिटल राज्यासाठी आदर्श ठरेल

अकलूजचे कोविड हॉस्पिटल राज्यासाठी आदर्श ठरेल

एकमत ऑनलाईन

अकलुज : कोरोना बाधित रुग्णांना वेळेत व योग्य उपचार मिळावेत यासाठी अकलूज येथे इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेले कोविड हॉस्पिटल संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरेल असे, प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते,. उपसभापती अर्जुनसिंह मोहिते -पाटील, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजित पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भिमाशंकर जमादार, जिल्हाशल्यचित्सक डॉ.प्रदिप ढेले, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते, डॉ.नितीन एकतपुरे, डॉ.एम.के.इनामदार उपस्थित होते.

कोरोना संसर्गरोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व संबधित यंत्रणा समन्वायाने काम करीत आहे. कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी अकलूज येथील सर्व खाजगी डॉक्टरांच्या माध्यमातून डेडीकेडेड कोविड हॉस्पिटल सुरु केले आहे. या हॉस्पिटल मुळे तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिकांना उपचारासाठी फायदा होणार आहे. रुग्णावरील उपचाराचे दर हे शासन निर्णयानुसारच आकारण्यात येणार आहेत. तसेच हे कोविड हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत कार्यवाही करावी, असे शंभरकर यांनी सांगितले.

कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी अकलूज येथील सर्व खाजगी डॉक्टरांनी सर्व सुविधयुक्त 100 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरु केले असून हे राज्यातील पहिले हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचारा बरोबरच त्यांचे समुपदेशन करण्यात येवून त्यांचे मनोबल वाढविण्यात येणार आहे. या हॉसिपटलचा अकलूज व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

राज्यात मातृभाषेतुन शिक्षणाची गरज-अक्षयसागरजी महाराज

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या