सोलापूर : कोरोना पार्श्वभूमीवर अनेक बंधनाच्या स्थितीत सिध्देश्वर मंदिर परिसरात सम्मती कट्टा येथे आज सकाळी ११.३० च्या सुमारास अक्षता सोहळा पार पयला. अवघे १०० लोक यावेळी उपस्थित होते. योगदंड आणि कुंभार कन्या यांचा विवाह सोहळा संपन्न होताच उपस्थितांनी सिध्दरामेश्वरांचा जयघोष केला.
यंदा अक्षता सोहळ्यासाठी नंदीध्वज मिरवणूकला परवानगी नव्हती. यामुळं केवळ योगदंय घेवून मानकरी सम्मती कट्ट्यावर पोहचले. येथे अक्षता सोहळा पार पयला. पारंपारिक बाराबंदी घालून मानक-यांनी पालखीसह मंदिर परिसरात प्रवेश केला. मानकरी हब्बू आणि इतर मंयळी बग्गीतून आली होती.
अक्षता सोहळ्या आधी पंच कमिटीचे सदस्य तसेच इतर पास धारक या ठिकाणी येवून थांबले होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे ही यावेळी अक्षता सोहळ्यासाठी उपस्थित होते. पारंपारीक वाद्य वाजवीत सिध्दरामेश्वरांचा जयघोष करीत उपस्थितांनी अक्षता सोहळ्यात सहभाग घेतला. सम्मती कट्टा परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. पालखीचं पुजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. खा. जयसिध्देश्वर शिवाचार्य यावेळी उपस्थित होते. अक्षता सोहळ्यात काही महिला भगिनींनाही सहभागी होता आलं. एरव्ही लाखोंच्या उपस्थितीत होणारा अक्षता सोहळा आज मात्र मोज्नया भाविकांच्या उपस्थितीत शासकय नियमांच पालन करीत पार पयला. स्थानिक वृत्तवाहिन्यांवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. सुगयी पुजन, पान सुपारी, अक्षता हे कार्यक्रम एरव्ही गर्दीमुळं भाविकांपर्यंत सहजगत्या दिसत नाहीत ते थेट प्रक्षेपणाद्वारे अनुभवता आले. सिध्देश्वर मंदिराकये येणारे सर्व रस्ते पोलीसांनी आधीच बंद करुन ठेवले आहेत. केवळ पास धारकांनाच सोयण्यात आलं.
वर्षभरापासून कोरोनाची जागतिक महामारी सुरू आहे. देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दूर होऊन पुन्हा सोलापूरला गतवैभव प्राप्त होऊ दे, असे साकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री सिद्धरामेश्वरांकडे घातले. आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी श्री. भरणे पत्रकारांशी बोलत होते. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार घालण्यात आलेल्या अटीनुसार पारंपरिक अक्षता सोहळा पार पडला. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे सदस्य, मानकरी उपस्थित होते. श्री. भरणे यांनी पालखीतील मुर्तींचे दर्शन घेतले. अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावून सिद्धेश्वर मंदिरातही दर्शन घेतले.
श्री. भरणे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील जनता सुखी होऊ दे, असा आशीर्वाद मागितला आहे. अजून कोरोनाचे संकट संपले नाही. लसीकरण मोहीम सुरू होईल, लस दिली तरीही नागरिकांनी गाफिल न राहता सर्वांनी कुटुंबासह स्वत:ची काळजी घ्यावी. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचा-यांना लस दिली जाणार असून टप्प्याटप्प्याने सर्वांना लस दिली जाणार आहे. पुढचे दोन-तीन महिने कठिण आहेत, शासकीय नियमाचे पालन केले तर कोरोना हद्दपार होईल.
देवस्थानच्या विकासासाठी प्रयत्नशील
कोरोनामुळे प्रशासनाने मानकरी आणि काही भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे इतर राज्यासह, जिल्ह्यातील भक्तांना उपस्थित राहता आले नाही, दर्शन करता आले नाही. पुढच्या वर्षी नियोजनपूर्वक यात्रा साजरी करूया. सिद्धरामेश्वर मंदिर देवस्थानच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही श्री. भरणे यांनी सांगितले. पालकमंत्री श्री. भरणे यांचा पंच कमिटीतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, मिंिलद थोबडे, पुष्कराज काडादी यांच्यासह पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीतील एक सण : मकरसंक्रांत !