26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रपंढरपुरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा; भीमानदीवरील जुना दगडी पुल पाण्याखाली

पंढरपुरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा; भीमानदीवरील जुना दगडी पुल पाण्याखाली

एकमत ऑनलाईन

उजनी धरण परिसरात व भीमा नदीच्या क्षेत्रात काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली असून भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पंढरपूर शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेले काही दिवसांपासून उजनी धरण क्षेत्रासह सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दमदार पाऊस होत असल्याने पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्रामध्ये ६० हजार क्युसेकच्या आसपास पाण्याचा प्रवाह सुरू आहे. यामुळे चंद्रभागा नदीपात्रा वरील जुना दगडी पुल पाण्याखाली गेला असून चंद्रभागेच्या वाळवंटातील साधुसंतांची मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. सध्या चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पंढरपूर तालुक्यात अनेक गावातील ओढे-नाले ओसंडून वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

देशात २४ तासांत आणखी ९३ हजार ३३७ नवे रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या