21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeसोलापूरमोहोळ नगरपरिषदेत नव्या इमारतीच्या जागेवरून आरोप-प्रत्यारोप

मोहोळ नगरपरिषदेत नव्या इमारतीच्या जागेवरून आरोप-प्रत्यारोप

एकमत ऑनलाईन

मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेच्या नवीन जागेची इमारत निश्चित करण्यासाठी गुरुवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण मासिक बैठकीमध्ये ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष शाहीन शेख होत्या.यामध्ये एकूण १३ जणांनी ऑनलाईन कॉन्फरन्सला ऑनलाईन उपस्थित राहून मतदान केले. त्यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्ष शाहीन शेख, रमेश बारसकर, सरिता सुरवसे,शौकत तलफदार , संतोष खंदारे, दत्तात्रय खवळे, मनीषा फडतरे, सुवर्णा गाढवे आठ नगरसेवकांनी आठवडा बाजार या जागेच्या निश्चीतीसाठी मतदान केले. तर विरोधी शिवसेना आघाडीच्या नगरसेविका सीमा पाटील, गटनेते महादेव गोडसे, राणी गोडसे, नसीमा बोंगे, अनिता सोनटक्के या पाच जणांनी आहे त्या जुन्या नगर परिषदेच्या ठिकाणी नवी इमारत होण्यासाठी मतदान केले. विशेष बाब म्हणजे या निवडणूक प्रक्रियेपासून राष्ट्रवादीचे नूतन उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे यापूर्वीचे गटनेते प्रमोद डोके, राष्ट्रवादीचे नगरसेवक अर्चना संतोष वायचळ, शिवसेना नगरसेवक अतुल गावडे, आणि भाजप नगरसेवक सुशील क्षीरसागर हे चार नगरसेवक या मतदान ऑनलाइन प्रक्रियेला प्रक्रियेला चक्क अनुपस्थित होते.

आठ विरुद्ध पाच मतांनी आठवडा बाजार जागा मंजूर
आठवडा बाजार या जागेला आठ नगरसेवकांनी बहुमतानी पसंती दिल्यामुळे प्रशासन स्तरावरून ही जागा निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असल्याचे समजते. शिवसेनेचे स्विकृत नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी राष्ट्रवादी आघाडीने घेतलेल्या निर्णयाला कडाडून विरोध केला असून या विरोधात व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. सध्याच्या आठवडा बाजाराच्या ठिकाणी नवी इमारत उभारून मोहोळचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा चांगला भरणारा आठवडा बाजार लहान करून तालुक्यातील अन्य गावचा आठवडी बाजार मोठा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे असेही सत्यवान देशमुख म्हणाले.
मोहोळ नगर परिषदेसाठी नव्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्यासाठी यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये आहेत या नगरपरिषद इमारतीच्या पाठीमागील दोन गट क्रमांक, तसेच जुनी भाजी मंडई आणि आठवडाबाजार अशा चार गट क्रमांकाच्या जागा सुचवण्यात आल्या होत्या. मात्र काही जागांना विरोधी पक्षातील नगरसेवकांनी विरोध केल्यामुळेच याबाबत निवडणूक प्रक्रिया आज झाली.

राष्ट्रवादी पक्षाचे उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, अर्चना वायचळ, शिवसेनेचे नगरसेवक अतुल गावडे तर भाजपाचे सुशील क्षीरसागर हे नगरसेवक या बैठकीला अनुपस्थित होते. तर अशा महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहणारे नगरसेवक मोहोळ चा काय विकास करतील याची शंकाच वाटते. सत्यते असूनही मतदानात सहभागी न झालेल्या या नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. दबाव गटाला बळी पडून जर तुम्ही तुमची भूमिका जाहीर करू शकत नसाल तर ही कसली लोकशाही?

इमारतीसाठी मंजूर होऊन आलेला निधी परत जाऊ नये म्हणून त्यामुळे आठवडा बाजार या जागेला बहुमताने पसंती देण्यात आली आहे. या ठिकाणी सुसज्ज इमारत तर होईलच मात्र पार्किंग देखील प्रशस्त उपलब्ध होईल. हा निर्णय ऑनलाइन मतदान प्रक्रियेने बहुमताने झाला आहे त्यामुळे विरोधक करत असलेले राजकारण शहर विकासाच्या दृष्टीने दुर्दैवी म्हणावे लागेल.
– शाहिन शेख,नगराध्यक्षा मोहोळ

नगरपरिषदेची इमारत मध्यवर्ती ठिकाणी व्हावी अशी माझ्यासह शहरातील हजारो नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे ठराविक ठिकाणी इमारत देण्याचा अट्टाहास निश्चितपणे दुर्दैवी आहे. काही निर्णय शहराच्या हितासाठी घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक म्हणण्यापेक्षा सर्वांनीच मिळून घेणे आवश्यक असते. मात्र बहुमताच्या मतांचा गैरवापर करत मोहोळ नगर परिषदेची मध्यवर्ती इमारत अन्यत्र हलविण्याचा सत्ताधा-यांचा निर्णय अन्यायकारक आणि निश्­चितपणे दुर्दैवी असल्याची खंत मोहोळच्या शिवसेना नगरसेविका सीमाताई पाटील यांनी केली आहे.

पाणी बचतीचा ‘मांजरा पॅटर्न’ तयार व्हावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या