30.4 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeसोलापूरसोलापूर मॅरेथॉनमध्ये पुरूष गटात कामतीचा अमोल यादव तर महिलांमध्ये केनियाची मोयुंगा क्रिस्टाईनने...

सोलापूर मॅरेथॉनमध्ये पुरूष गटात कामतीचा अमोल यादव तर महिलांमध्ये केनियाची मोयुंगा क्रिस्टाईनने बाजी मारली

एकमत ऑनलाईन

सोलापूर(प्रतिनिधी): सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आपटे डेअरी आंतरराष्ट्रीय सोलापूर मॅरेथॉनमध्ये २१ किलोमिटर पुरूष गटात सोलापूर जिल्ह्यातील कामतीचा अमोल यादव तर महिला गटात केनियाची मोयुंगा क्रिस्टाईन हिने प्रथम क्रमांक मिळवत विजय संपादन केले.

गेल्या सहा महिन्यापुर्वीपासून तयारी करण्यात येत असलेल्या सोलापूर रनर्स असोसिएशनच्या सोलापूर मॅरेथॉन स्पर्धा रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी पार पडली. २१ किलोमिटर, १० किलोमिटर आणि साडेतीन किलोमिटर अशा तीन गटामध्ये झालेल्या या स्पर्धेत जवळपास ३ हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. या मॅरेथॉनपुर्वी दर रविवारी धावपटूंसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. सोलापूर शहर जिल्ह्यासह जिल्ह्याच्या बाहेरील आणि देशाच्या बाहेरील म्हणजेच केनिया या देशातील धावपटूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. पहाटे ५ वाजता सर्व धावपटूंना एकत्र करून हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर वॉरमाप तसेच झुंबा डान्स घेण्यात आला. त्यानंतर ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या समोर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते २१ किलोमिटर मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी ६.३० वाजता त्यानंतर ६.४५ वा. १० किलोमिटर मॅरेथॉन स्पर्धेलाही झेंडा दाखवून सुरूवात झाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांच्या हस्ते सकाळी ७.३० वाजता फन रन म्हणजेच साडेतीन किलोमिटरच्या मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.

२१ किलोमिटरची मॅरेथॉन ज्ञानप्रबोधिनीपासून डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता शासकीय विश्रामगृहासमोरून पत्रकार भवन, विजापूर नाका, आयटीआय चौकातून डाव्या बाजुला वळून भारती विद्यापीठ, डी मार्ट समोरून, टाकळीकर मंगलकार्यालय समोरून पुन्हा विजापूर रोड सैफूलमार्गे एसआरपीएफ कॅम्प पासून माघारी येवून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप करण्यात आली तसेच १० किलो मिटरची ज्ञानप्रबोधिनी पासून सुरूवात होवून डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता शासकीय विश्रामगृहासमोरून, पत्रकार भवन, विजापूर नाका, आयटीआय चौकातून डाव्या बाजुला वळून भारती विद्यापीठ, गोविंदश्री मंगल कार्यालय समोरून माघारी फिरून पुन्हा त्याच मार्गाने येवून ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप झाली. तसेच फन रन साडेतीन किलोमिटरची मॅरेथॉन ज्ञानप्रबोधिनी पासून सुरूवात होवून डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता येथून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यां धावपटूंना आमदार प्रणिती शिंदे, स्पर्धेचे प्रायोजक आपटे डेअरीचे आल्हाद आपटे, विनय आपटे, सारंग आपटे, गायत्री आपटे, शार्दुल आपट तसेच मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या