24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeसोलापूरमृत्यू देह घेऊन निघालेल्या ॲम्बुलन्स ला मोहोळनजीक मोठा अपघात

मृत्यू देह घेऊन निघालेल्या ॲम्बुलन्स ला मोहोळनजीक मोठा अपघात

एकमत ऑनलाईन

मोहोळ : पुण्याहून सोलापूरकडे मृतदेह घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेने समोरच्या मालट्रकला पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत .हा अपघात शनिवारी ( ता . १४ ) पहाटे ३:४५ वाजता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरा लगत कन्या प्रशाला चौकात झाला . या अपघातामध्ये मृत्यू कॉलेजची नावे रवी माणिक राठोड ( वय ३८ , रा . माळवाडी , पुणे ) , बुद्वीबाई चन्ना पालत्या ( वय ४८ , रा . माळवाडी ) व एक अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत.

https://youtu.be/V9vwsek1Ki4

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रज ( पुणे ) येथे मोलमजुरीसाठी गेलेल्या सुकट्या नूरयों खतरावत यांचे अपघातामुळे निधन झाल्याने त्यांचा मृतदेह घेऊन त्यांचे नातेवाईक पुण्याहून रुग्णवाहिकेने ( एम.एच. १२ आर.एन. ६३८७ ) तेलगंणकडे चालले होते . पहाटे पावणेचारच्या सुमारास मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकात येताच पुण्याहून हैदराबादला चाललेल्या मालट्रकला ( एमएच ४३ बीजी ४५०० , चालक नागनाथ गंगादर कदम वय ४० , मळेगाव , ता . लोहारा , जि . उस्मानाबाद ) पाठीमागून जोराची धडक दिल्याने रुग्णवाहिकेतील रवी माणिक राठोड ( वय ३८ , रा . वारजेवाडी , जि . पुणे ) , बुद्धीबाई चन्ना पालत्या ( वय ४८ ) यांचे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारापूर्वीच निधन झाले . तर उपचारादरम्यान अन्य एकाचे निधन झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली . रुग्णवाहिकेतील इतर ९ जखमी आहेत . जखमीपैकी रामलू धनंिसग राठोड ( वय ४५ ) , रामलू सोमनाथ राठोड , आशा सुभाष राठोड ( वय ४० ) , लोकेश धनंिसग राठोड ( वय ३९ ) , किसन रामलू राठोड ( वय ३९ ) , नीलेश भानू पवार ( वय ३० ) , किसन नारायण राठोड ( वय ४०) , असलीबाई किसन राठोड ( वय ३८ ) व अन्य ( सर्व राहणार वारजेवाडी , पुणे ) यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान , अपघात झाल्याचे समजताच तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिस निरीक्षक अशोक सायकर , अवी शिंदे , गणेश दळवी , मंगेश बोधले , सतीश पवार , पोलिस वाहन चालक अवघडे , सतीश पवार ग्रामरक्षक दलाचे पथक यांच्यासह इतर पोलिस कर्ममचारी व महामार्ग टोलनाक्याच्या कर्मचा-यांनी इतर तीन रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयाकडे पाठविले . तर जो मृतदेह घेऊन रुग्णवाहिका चालली होती , त्या रुग्णवाहिकेत सकाळी ११ वाजपर्यंत मृतदेह तसाच आहे पोलिसांनी मृतदेह नेण्यासाठी नातेवाईक येत असल्याचे सांगितले . अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून , अधिक तपास हवालदार अविनाश शिंदे करीत आहेत.

फटाक्यांवर बंदी कशासाठी?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या