26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeसोलापूररेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तब्बल ३२ लाखांचा गंडा

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तब्बल ३२ लाखांचा गंडा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : तलाठी, वनविभाग, रेल्वे टीसी अशा विविध ठिकाणी नोकरी लावून देतो असे म्हणत सोलापुरातील होमगार्डसह १० जणांची सहाजणांनी फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत धनाजी अरुण भोसले (वय २७, रा. कोंडीगाव, उत्तर सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

धनाजी यांना २०१९ मध्ये आरोपी सतीश नागनाथ केंगार (रा. पाकणी, उत्तर सोलापूर) याच्या माध्यमातून आरोपी किरण रामदास शेजवाळ (रा. कल्याण, ठाणे) यांची ओळख करून दिली. शेजवाळ हा मंत्रालयात कामाला असून त्याची मंत्रालयात मंत्र्यांशी ओळख असून कोणतीही सरकारी नोकरी लावून देतो असे त्याने सांगत विश्वास संपादन करून घेतला. फिर्यादी धनाजी यांच्याकडून रोख व बँक खात्यात एकूण पाच लाख रुपये घेतले. ही रक्कम त्याने आरोपी सतीश केंगारकडे रोखीने आणि त्याने किरण शेजवाळ याच्या व आरोपी कांचन किरण शेजवाळ (रा. कल्याण, ठाणे)

यांच्या खात्यात पाठविले. याशिवाय इतर नऊजणांना इतर विविध विभागांत नोकरी लावतो असे सांगत त्यांच्याकडून ३१ लाख ७० हजार रुपये घेतले. तसेच फिर्यादी व इतरांना नोकरी न लावता, तसेच त्यांची रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी धनाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी अण्णाराव डी. बिराजदे (रा. मुरारजी पेठ), कांचन शेजवाळ, किरण शेजवाळ, रोशनी शशीकांत गायकवाड (रा. मेन रोड, उल्हास नगर, ठाणे), सतीश नागनाथ केंगार (रा. पाकणी), सुरेश डी. सोपडकर (रा. नवी मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी धनाजी याने आरोपी सतीश केंगारच्या माध्यमातून पैसे दिल्यानंतर काहीच दिवसांनी धनाजी याने रेल्वेची टी. सी. परीक्षा दिलेली नसतानाही त्याला टी. सी. परीक्षा पास झाल्याचा मेल आला. तसेच वैद्यकीय तपासणीसाठी कोलकोता, बंगाल येथे बोलवण्यात आल्याचे फिर्यादीत नोंद झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या