बार्शी: बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृवताखाली बार्शीत भारतीय जनता पार्टी,रिपाइं,रासप यांच्यावतीने राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात दूध दरवाढ व दूध पावडरला अनुदान मिळावे याकरिता बार्शी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेस दुधाने आंघोळ घालून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला व तहसीलदार यांचे प्रतिनिधी म्हणून मंडल अधिकारी उमेश डोईफोडे यांना निवेदन देऊन मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या.
यावेळी आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन, दूध दरवाढीच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी आंदोलनात पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले,रमेश पाटील,कृष्णराज बारबोले, मदन दराडे,महावीर कदम,शिवाजी सुळे,अॅड.अविनाश गायकवाड,मक्रोज बोकेफोडे,प्रमोद वाघमोडे,अविनाश मांजरे,सुमंत गोरे,नगरसेवक दीपक राऊत,कयूम पटेल,भारत पवार,नागजी दुधाळ,पाचू उघडे,विजय चव्हाण,भैया बारंगुळे,काकासाहेब फुरडे,गणेश चव्हाण,रितेश वाघमारे,रमाकांत सुर्वे,संदेश काकडे,रोहित लाकाळ,धनंजय जाधव,डॉ.भारत पंके,बापूसाहेब कदम,प्रशांत खराडे,सोनू पवार,युवराज ढगे,पिंटू यादव,शंतनु पवार आदी सहभागी झाले होते.
माढा तालुक्यात रयत क्रांती संघटनेच्या वतीने दुध आंदोलन
माढा तालुक्यामध्ये रयत क्रांती संघटनेच्यावतीने विविध गावांमध्ये दुध बंद आंदोलन करण्यात आले. ऊजनी (टें)येथे रयत क्रांती संघटनेच्यावतीने मारूतीला दुग्धाभिषेक करून महाआघाडी सरकारला सुबुद्धी येवू दे असे साकडे घालण्यात आल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्स प्रा सुहास पाटील यांनी सांगितले.सरकारने गाईच्या दुधाला दुधाला १० रुपये प्रति लिटर अनुदान अनुदान दिले पाहीजे. तसेच दूध भुकटीला ५० रुपये प्रति किलो अनुदान दिले पाहिजे. कोरोनामुळे शेतक-यांचा माल विकला जात नाही.शेतर्कयांचे प्रचंड नुकसान होत आहे.
या नुकसानीस महाआघाडीचे सरकारच जबाबदार आहे. सध्याचे सरकार दूध उत्पादकांना पेक्षा व्यापा-यांना सांभाळत आहे. तरी या सरकारच्या विरोधात संपूर्ण माढा तालुक्यामध्ये रयत क्रांती संघटना आक्रमकपणे दुध आंदोलन करत आहे असे प्रा सुहास पाटील यांनी सांगितले. यावेळी ऊत्पादक शेतकरी परशुराम नवले,बाबासाहेब पानबुडे,माजी ऊपसरपंच समाधान गवळी,मंिच्छद्र घाडगे, कवडे,विश्वजीत पाटील आदीजण उपस्थितीत होते.
गरजूंना केले दुधाचे मोफत वाटप
सरकारने गाईच्या दुधाला १० रुपये प्रति लिटर अनुदान तसेच दूध भुकटीला ५० रुपये प्रति किलो अनुदान दिले पाहिजे. कोरोनामुळे शेतक-यांचा माल विकला जात नाही.विकला तर कवडीमोल भावाने विक्री होत असल्यामुळे शेतर्कयांचे प्रचंड नुकसान होत आहे.या नुकसानीस महाआघाडीचे सरकारच जबाबदार आहे.सध्याचे सरकार दूध उत्पादकांना पेक्षा व्यापा-यांना सांभाळत आहे.तरी या सरकारच्या विरोधात माढा तालुक्यामध्ये रयत क्रांती संघटना आक्रमकपणे दुध आंदोलन केले आहे.
तांदुळवाडी,पापनस,चिंचगाव,वडशिंगे आदि गावातून दुधाचे संकलनच केले नाही तर रिधोरे येथे संकल केलेले दुध रस्त्यावर ओतून न देता गरजूंना मोफत वाटप करण्यात आले.रिधोरे येथे दत्ताञय गायकवाड,बळीराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.शेतक-यांनी सरकारचा निषेध करत आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
यावेळी राजकुमार गायकवाड,संदिप गायकवाड,गजेंद्र शिंदे,डिगंबर शिंदे, प्रशांत करळे,नितीन गायकवाड,अभिजीत ढोरे, प्रविण क्षिरसागर,धनंजय गोडगे,सौरभ गायकवाड, रामकृष्ण गायकवाड,सौदागर गायकवाड,सुनिल गायकवाड,बजरंग पाटील आदि शेतकरी उपस्थित होते.
भाजप व मित्र पक्षाच्या वतीने नायब तहसीलदारांना दिले निवेदन
गायीच्या दुधाला सरसकट १० रु. लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु. अनुदान व दुध खरेदीचा दर ३० रुपये करावा या मागणी करिता माळशिरस तहसील कार्यलय येथे भाजपा व मित्र पक्षाच्या वतीने नायब तहसीलदार तुषार देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,माळशिरस विधानसभा आमदार राम सातपुते, भाजपाचे के के पाटील , माजी सभापती धैर्यशील मोहिते पाटील,सभापती शोभा साठे ,उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील ,तालुका अध्यक्ष सोपानराव नारनवर , रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गोरड,माजी उपसभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील रिपाई तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले,अरुण तोडकर ,किशोर सूळ ,दत्तात्रय भिलारे , हनुमंत सूळ, सोमनाथ भोसले ,किरण धाईजे ,सुरेश तरंगे, बाळासाहेब सरगर , बाळासाहेब वावरे ,अजित बोरकर , संजय देशमुख , राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सुळ पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव एन के साळवे, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले ,जिल्हा कार्याध्यक्ष किरणतात्या धाईंजे, अक्षय वाईकर, सरचिटणीस मिंिलद सरतापे, कार्याध्यक्ष मारुती खांडेकर, आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज चौकात रास्ता रोको
गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये प्रति लिटर अनुदान व दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदानाच्या मागणीसाठी भाजपा महायुतीच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज चौकात दूध एल्गार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादक शेतक-याला प्रतिलिटर दहा रुपये वाढवून दिलेच पाहिजेत, गाईच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान व दूध पावडर करिता प्रतिकिलो 50 रुपये अनुदान शासनाकडून तीस रुपये प्रति लिटर दराने दुधाची खरेदी या मागणीकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
या आंदोलनात भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील, प्रांतीय सदस्य गोवींदराव कुलकर्णी, तालुकाध्यक्ष संजय टोणपे, गिता देशमुख, बबनभाऊ केचे, बाळासाहेब गडदे , चंद्रकांत वाघमारे, कुमार वाघमारे, विनायक भगत, मदन मुंगळे, सोमनाथ गायकवाड, यशपाल लोंढे, दत्ता गायकवाड, बळीराम गायकवाड, सुरज देशमुख,विजय कोकाटे,श्रीधर शिंदे, माऊली भगत, अमोल कुलकर्णी, डॉ.सयाजी देशमुख, धनाजी लादे, अनंत राऊत, सचिन गायकवाड, बबनराव ताकभाते, नंदकुमार मोरे राजकुमार बागल, सुहास साळुंखे, तालुका उपाध्यक्ष औदुंबर , युवा मोर्चा शहराध्यक्ष सुधीर गाडेकर, सौरभ परबत, क्षितीज टोणपे, सौमित्र परबत, अनंत राऊत आदी सहभागी होते.
Read More युवकांनी निर्भय होऊन देशाला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे-राज्यपाल