26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeसोलापूरबार्शी तालुक्यातील गौडगावात सापडल्या सातवाहन काळातील दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू

बार्शी तालुक्यातील गौडगावात सापडल्या सातवाहन काळातील दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू

एकमत ऑनलाईन

बार्शी (विवेक गजशिव) : सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे पुरातत्व संशोधकाने केलेल्या संशोधनामधून गौडगाव ते कात्री रस्त्यावर तब्बल 2 हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू सापडल्याने बार्शीच्या वैभवात भर पडली आहे.त्यामुळे गौडगाव येथील गावाचा व परिसराचा इतिहास उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बार्शी-तुळजापूर राज्यमार्गावर वसलेल्या गौडगाव येथे अनेक ऐतिहासिक व धार्मिक वास्तू पाहावयास मिळतात.

गौडगागाव ऐतिहासीक आणि धार्मिक वास्तूंचे गाव
येथे 100 ते 150 वर्षांपूर्वीचे वाडे, हनुमान मंदिर, यमाईदेवीच्या मंदिरापाशी काही प्राचीन वीरगळ आणि प्राचीन मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात.हनुमान मंदिराच्या गार्भा­यात उत्तर चालुक्य कालिन विष्णूमूर्ती पाहावयास मिळते.विष्णू मूर्तीच्या हाता पद्म, शंख, चक्र, गदा ही आयुध, डोक्यावरती किरीट मुकुट, कानात कर्णकुंडले दंडात केयूर,हातात कंकण,गळ्यामध्ये ग्रिविका एकावली माळा तर पायात तोडे,नुपूर अशाप्रकारचे अलंकार आहेत.त्याच्याच शेजारी मोठा शिवंिलग व एक गणेशमूर्ति आहे.तेथील शिवलींगावरून असे लक्षात येते की गावांमध्ये तत्कालीन काळामध्ये शिवमंदिर असावे.

तसेच येथे मंदिराचे काही अवशेष ही आढळून येतात.परंतु, मंदिर कोठे व कसे होते हे पुराव्याअभावी सांगता येणार नाही.हे मंदिर उत्तर चालुक्य कालिन असावे असा अंदाज आहे. गौडगांव गावाच्या उत्तरेला गौडगांव- कात्री रोडवर डाव्या बाजुला वाडी (गावठाण) म्हणून ठिकाण आहे. तेथे सर्वेक्षण व उत्खनन केले असता काही अवशेष मिळाले आहेत. त्यामध्ये मृद्-भांड महत्वपूर्ण आहेत.सातवाहन काळातील मृद्-भांडचे भग्न लाल रंगाचे तुकडे प्राप्त झाले. त्याचबरोबर आंध्राकिसक्रॉस वियर हे प्रसिद्ध मृद्-भांड प्राप्त झाले.आंध्रा किसक्रॉस वियर हे सातवाहन कालखंडाशी सलग्नीत आहे.तसेच सुपारीच्या आकाराचा भाजलेला मातीचे मणी,निळ्या रंगाचा मणी, प्राचीन काळातील बांगड्या भग्न अवस्थेत प्राप्त झाल्या ज्या शंखा पासून बनवलेल्या होत्या. छोट्या आकाराचे ब्लेज जे कॅल्सीडोनी पासून बनवलेले आहे. कार्लेनियन,अ‍ॅगेट आणि हिरव्या आकाराचे मौल्यवान दगड,एक बहामनी कालखंडातील तांब्याचे नाणे व एक दोन्ही बाजूनी सपाट असलेले नाणे मिळाले.या ठिकाणी हाडे जास्त प्रमाणात मिळतात. सध्या ह्या भागावर शेती केली जाते.

मिळालेल्या अवशेषावरून व प्राचीन वस्तूवरून याचा कालखंड सातवाहनपर्यंत जातो.पुढील सविस्तर अभ्यासासाठी इथे अधिकच्या उत्खननाची गरज आहे.
– महेश दसवंत
(इतिहास व पुरातत्व अभ्यासक)

गौडगाव येथे दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू सापडल्याने गौडगावला मोठा ऐतिहासिक वारसा लाभणार आहे. ग्रामस्थ व पुरातत्व विभाग यांच्याशी चर्चा करून परिसरात अधिकचे उत्खनन व सर्वेक्षण करून ऐतिहासिक खजीना जगाच्यासमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार.
– स्वाती पैकेकर (सरपंच गौडगाव)

दुहेरी मोक्कातील आरोपीसह तिघांना पकडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या