29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसोलापूरसहप्रवासी बनून प्रवाशांना लुटणा-या महिलांच्या टोळीला अटक

सहप्रवासी बनून प्रवाशांना लुटणा-या महिलांच्या टोळीला अटक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : विजापूर महामार्गावर एसटी बस मधून व शहरातील रिक्षांमधून सहप्रवासी बनून प्रवाशांच्या बॅगेतून दागिने व पैसे चोरणा-या महिलांच्या टोळीला तसेच पुष्कर हॉटेल येथील चोरी प्रकरणातील विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेऊन एकूण 1 लाख 8 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल विजापूर नाका डीबी पथकाने जप्त केले आहे.

विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत गर्दीचा फायदा घेऊन एसटी बस मधून लक्ष्मी हार चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती तसेच शहरातील बँकेतून पन्नास हजार रुपये घेऊन रिक्षातून प्रवास करीत असताना तीन महिलांनी सहप्रवासी म्हणून नजर चुकीने पळून नेहमी असल्याची तक्रार विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने बातमी दाराकडून माहिती प्राप्त करून सदर गुन्ह्यातील महिला सैफुल येथे येणार असल्याची माहिती मिळताच विजापूर नाका डीबी पथकाने सापळा रचून या महिलांना ताब्यात घेतले व त्यांची कसून चौकशी केली असता वरील दोन्ही गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केले.

या गुन्ह्यातील महिला आरोपी ची नावे यस्सरी शिवा परकालालू (वय 32 मुळगाव नांदेड सध्या रा. इस्कॉन मंदिर अक्कलकोट रोड सोलापूर ) शारदा कृष्णा गाजू वय 35, शांती कृष्णा गाजू वय 45, राधा राकेश पद्मशाली वय 32, ज्योती राजू गाजू वय 30, मिल्की विशाल परकलालू वय 30, मंजू परकालालू वय 30 सर्व राहणार इस्कॉन मंदिर अक्कलकोट रोड सोलापूर या महिलांकडून 44 हजार रुपयांची रोख रक्कम व लक्ष्मीहार असा एकूण 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच पुष्कर हॉटेल येथून घरफोडी करणा-या पाच विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीला गेलेला 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त विजापूर नाका डीबी पथकाने केला आहे. ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त डॉ वैशाली कडूकर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुपोनि अजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ डी बी पथकातील संजय मोरे, श्रीरंग खांडेकर, राजकुमार तोळनुरे, शावर सिद्ध नरोटे, प्रकाश निकम, अयाज बागलकोटे,आलम बिराजदार, इम्रान जमादार अनिल गवसणे,लखन माळी, शिवानंद भिमटे,विशाल बोराडे,सतीश पाटील,महिला पोलीस शिपाई वैशाली मोरे, वर्षा चव्हाण, अश्विनी ठोंबरे या पोलीस कर्मचा-यांनी केली आहे.

गोवा फॉरवर्ड पक्ष रालोआतून बाहेर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या