21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeसोलापूरपंढरीत उद्या श्री विठ्ठलाचा आषाढी वारी सोहळा

पंढरीत उद्या श्री विठ्ठलाचा आषाढी वारी सोहळा

एकमत ऑनलाईन

पंढरपूर (अपराजित सर्वगोड) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा आषाढी वारी सोहळा आज पंढरपुरात साजरा होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी परंपरेनुसार दशमी दिवशी संतांच्या पालख्या एसटीने वाखरी पालखी तळावर दाखल झाल्या आणि वाखरी ते पंढरपूर पायी चालत पंढरपूरात दाखल झाल्या आहेत.

आज संतांच्या साक्षीने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत श्री विठ्ठलाचा आषाढी वारी सोहळा साजरा होत आहे. सलग दुस-याहि वर्षी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गर्दी होऊ नये यासाठी प्रमुख दहा संतांच्या पालख्यांसोबत मोजक्या भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. यानुसार दशमी दिवशी प्रमुख संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या संतांच्या पालख्यांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

तसेच आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंढरपुरात दाखल झाले असून त्यांच्यासह मानाचे वारकरी म्हणून निवडण्यात आलेले मंदिरातील विणेकरी केशव कोलते यांच्या हस्ते आषाढी एकादशीची महापूजा पहाटे २.२० मिनिटांनी होणार आहे. यासाठी काही ठराविक पदाधिका-यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

दरम्यान पंढरपूरात आषाढी एकादशीच्या दिवशी गर्दी होऊ नये यासाठी जिल्हा, तालुका आणि शहर अशी तीन स्तरीय नाका-बंदी करण्यात आली आहे. याचबरोबर चंद्रभागा वाळवंटात स्रान करण्यास बंदी घालण्यात आली असून पंढरपूर आणि परिसरात जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे आषाढी एकादशी दिनी पंढरी सुनी सुनी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

बोरी भागात ढगफुटी, शेतकरी अडचणीत; ५० गावांतील सोयाबीनसह इतर पिकांचे नूकसान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या