22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeमहाराष्ट्रआषाढी वारीचा कार्यक्रम ठरला; वाखरीपासून दीड किमी पायी वारीला परवानगी

आषाढी वारीचा कार्यक्रम ठरला; वाखरीपासून दीड किमी पायी वारीला परवानगी

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या १० पालख्यांना एसटी बसमधून पंढरपूरला जाण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारी २०२१ च्या नियोजनाला सोमवारी राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. त्याबाबतचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. त्यानुसार मानाच्या १० पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारक-यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. भाजप नेत्यांनीही नियम घालून पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारनं यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे.

सरकारच्या आदेशानुसार यंदाही मानाच्या १० पालख्यांना एसटी बसनेच पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. मात्र, वाखरीपासून दीड किलोमीटरचं अंतर पायी चालत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुख्मिणीच्या शासकीय महापूजाही मागील वर्षीप्रमाणे नियम पाळूनच होणार आहे. आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या १९५ संत महाराज मंडळींना विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार आहे. तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील तसेच दहाही मानांच्या पालख्यांना वारीला जाण्यासाठी २० बसेस दिल्या जाणार आहेत. पालखीसोबत जाणा-या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे.

तर देहू-आळंदी पालखीबरोबर १०० जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे तर इतर पालखीबरोबर प्रत्येकी ५० जनांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सर्व पालख्यांना कोरोनाचे नियम पालन करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली आहे.दरम्यान, भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

१) वाखरीपासून दिड किलोमीटर पायी वारीस परवानगी
मानाच्या १० पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारक-यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

२) या मानाच्या १० पालख्यांना परवानगी
संत निवृत्ती महाराज (र्त्यंबकेश्वर), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी),संत सोपान काका महाराज (सासवड),संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर),संत तुकाराम महाराज (देहू),संत नामदेव महाराज (पंढरपूर),संत एकनाथ महाराज (पैठण),रुक्मिणी माता (कौडानेपूर -अमरावती), संत निळोबाराय (ंिपपळनेर – पारनेर अहमदनगर), संत चांगाटेश्वर महाराज (सासवड)

उद्यापासून जिल्ह्यातील शाळा सुरू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या