23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeसोलापूरआषाढीवारी यंदाही प्रतिकात्मकच

आषाढीवारी यंदाही प्रतिकात्मकच

एकमत ऑनलाईन

सोलापूर : कोरोनाच्या दुस-या लाटेचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे आटोक्­यात आलेला नाही. दुसरीकडे तिस-या लाटेची शक्­यता वर्तविली जात असल्याने गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्­यता आहे. त्यामुळे यंदाची आषाढी वारीही प्रतिकात्मक स्वरूपातच साजरी व्हावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर यांनी मदत व पुनर्वसन विभागाला पाठविल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यावर पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल.
पंढरीच्या आषाढी वारीच्या अनुषंगाने 14 जून रोजी संत मुक्­ताईंची पालखी (ंिदडी) प्रस्थान करणार आहे. त्यानंतर विविध टप्प्यांवरती संतांच्या पालख्या पंढरीकडे निघतात. परंतु, कोरोनामुळे सर्वसामान्यांसह सर्वांचे हाल झाले असून अनेकांना त्यात जीव गमावावा लागला आहे.

या काळात हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाले नाहीत. आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला होता. या परिस्थितीचा अनुभव पाहता आषाढी वारीचा सोहळा यंदाही प्रतिकात्मक स्वरूपातच साजरा व्हावा. कोरोनामुळे पायी वारी रद्द करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून पाठविण्यात आला आहे. मंदिर समितीकडून प्रातांधिकारी सचिन ढोले यांच्याकडे प्रस्ताव आला. त्यानंतर त्यांनी वारीसंदर्भात अभिप्राय देऊन तो प्रस्ताव पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठविला. पोलिस प्रशासनाच्या अभिप्रायानंतर तो प्रस्ताव जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमधील निर्बंध अजूनही पूर्णपणे शिथिल झालेले नाहीत. पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशसह विविध राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. वारीवेळी होणारी गर्दी पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्­यता आहे. त्यातून तिस-या लाटेला निमंत्रण मिळेल, अशी भिती आहे. त्यामुळे यंदाची आषाढी वारी मागील वर्षीप्रमाणेच साजरी करणे सर्वांसाठी सुरक्षित आहे. मानाच्या पालख्या हेलिकॉप्टर अथवा एसटीतून आणल्या जाव्यात, असे मदत व पुनर्वसन विभागाचे म्हणणे आहे. त्यावर सविस्तर चर्चा होऊन हा विभाग आपला अभिप्राय शासनाला देणार असल्याची माहिती विश्­वसनिय सूत्रांनी दिली.

‘प्रदर्शनासाठी’चा उतावळेपणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या