सोलापूर : आईवर कु-हाडीने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मुलास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. मंगेश माधव परांजपे (रा. राजस्व नगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.
मे २०२० मध्ये आई शारदा माधव परांजपे (रा. राजस्व नगर) यांच्यावर मुलगा माधव याने कु-हाडीने हल्ला केला होता. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात मंगेशच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून साहाय्यक पोलिस निरीक्षक बी. एच. पाटील व पोलिस उपनिरीक्षक बेंबडे यांनी तपास करून न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटला दाखल झाल्यानंतर न्यायालयात आईने सरकार पक्षाच्या विरोधात साक्ष दिली.
त्यावेळी पीएसआय बेंबडे यांनी फिर्यादी शारदा परांजपे यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे नोंदविलेली फिर्यादी जबाब साक्ष न्यायालयासमोर सादर केली. या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदाराची साक्ष ग्रा धरून न्यायालयाने आरोपी मंगेश यास सहा महिने सक्तमजुरी आणि २०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे अॅड. नागनाथ गुडे यांनी काम पाहिले. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कॉन्स्टेबल स्वामी, सोनटक्के यांनी मदत केली. कोर्ट पैरवी म्हणून एस. एस. घाडगे यांनी कामकाज पाहिले.