24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeसोलापूरपंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचे आसुड आंदोलन.

पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचे आसुड आंदोलन.

एकमत ऑनलाईन

पंढरपूर (प्रतिनिधी) : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने सकल मराठा समाजाने सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली होती. याला पंढरपुरात सर्वत्र दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. आंदोलकांनी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या मारुन आसूड ओढून आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनाला पंढरपूर शहरातील अनेक पक्ष व संघटनांनी उपस्थित राहून  पाठिंबा दिला. सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी उद्योजक अभिजीत पाटील, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, मनसेचे दिलीप धोत्रे, आरपीआयचे सुनील सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, मुस्लिम समाजाचे बशीर तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप मांडवे, मराठा महासंघाच्या अर्जुन चव्हाण, स्वागत कदम, राम गायकवाड यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने सकल मराठा समाजाने सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली होती.याला पंढरपूर येथील नागरिकांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला.या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात जागरण गोंधळ घालून आणि आसूड ओढून सरदाराचे लक्ष वेधले.

मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला स्थगिती मिळण्याचा निर्णयामुळे समाजावर खुप मोठा अन्याय झाल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. सर्वांना न्याय व्यवस्थेचा व राज्यघटनेचा आदर आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लाखों नागरिकांनी रस्त्यावरून उतरून शांततापूर्वक आंदोलने केली. मुक मोर्चे काढले प्रसंगी बलिदान दिले.

मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे अनेक युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण अबाधित राहावे,गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. मराठा आरक्षण हे मराठा समाजाच्या हक्काचे आहे, ते अबाधित राहीले पाहिजे. अशी मागणी उद्योजक अभिजीत पाटील यांनी यावेळी केली.

यासाठी सर्वोच्च न्यायालयात सरकारने परत फेरविचार याचिका करावी. न्याय मिळवून द्यावा.सरकारने नोकऱ्या कायम ठेवण्यासाठी आध्यादेश काढावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांना कडून करण्यात आली.

ई-कॉमर्सवरील वेब लिंक खादी आयोगाच्या पुढाकाराने बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या