22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeसोलापूरबंँक अधिकार्‍यांच्या बैठकीत कर्जासाठी त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला...

बंँक अधिकार्‍यांच्या बैठकीत कर्जासाठी त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

एकमत ऑनलाईन

मंगळवेढा : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये राष्ट्रीयकृत बंँक अधिकार्‍यांची शेतकर्‍यांच्या समवेत कर्जाविषयी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत चक्क कर्जासाठी त्रस्त झालेल्या एका शेतकर्‍याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,संतापलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी आय.सी.आय.सी.आय बँकेच्या अधिकार्‍याच्या अंगावर शाई फेकण्यात आली.

सध्या रब्बी हंगाम सुरु असून यंदा निसर्गाने चांगली साथ दिल्यामुळे पिक लागवडीसाठी शेतकर्‍यांना आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी शेतकर्‍यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील बँकांकडे कर्ज मागणी केली आहे. शेतकर्‍यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी दुपारी भारतीय स्टेट बँक,बँक ऑफ इंडिया,आय.सी.आय.सी.आय,कोकण विदर्भ,बंंक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या अधिकार्‍यानी कर्जाविषयी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सर्व बँकांचे अधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चर्चा सुुरु असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अधिकारी कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच आक्रमक झाले. यामध्ये अरळी येथील शेतकरी शंकर संघशेट्टी याने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या शेतकर्‍याने आय.सी.आय.सी.आय. बँकेकडे चार महिन्यापुर्वी कर्जासाठी सर्व कागदपत्रे देवूनही अदयापही कर्ज उपलब्ध झाले नाही.संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी माचणूर येथील आय.सी.आय.सी.आय बँकेचे चेअरमन देशमाने यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला.शेतकर्‍यांनी घोषणाबाजी करीत बँक अधिकार्‍याचा निषेध व्यक्त केला.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या