सोलापूर : युवतीला लग्नाचे आमिष दाखवत जबदरस्तीने अत्याचार करत, तिच्यासोबत काढलेले नग्न फोटो सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संजय बेत (वय २२, रा. सोलापूर) याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमांअतर्गत शहरातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित युवती ही सध्या अठरा वर्षांची असून तिची दोन वर्षांपूर्वी आरोपी संजय याच्याशी ओळख झाली होती. त्या ओळखीतून आरोपीने पीडितेला जबरदस्तीने एका पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन अत्याचार करत दोघांचे नग्न फोटो काढले. त्यानंतर त्याने अचानक बोलणे बंद करत लग्न करण्याचा विषय टाळू लागला. त्यानंतरही त्याने काढलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. काही दिवसातच त्याने नग्न फोटोवर स्टिकर टाकून सोशल मीडियावर टाकले. यानंतर पीडितेने याबाबत आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर संजय बेत याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.