सांगोला : माण नदीतून वाळू उपसा करण्याच्या वादातून सातजणांनी शिवीगाळ करीत घातक शस्त्रे घेऊन नऊ जणांना मारण्याच्या हेतूने अंगावर धावत आले; परंतु सर्वजण तेथून पळून गेल्याने अनर्थ टळला. मात्र, एकाने कारने दुचाकीला धडक देऊन एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
ही घटना २८ जुलै रोजी रात्री ११.३० च्या सुमारास वाढेगाव (ता. सांगोला) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. याबाबत शहाजी विलास माने (रा. वाढेगाव) यांनी फिर्यादी दिली. पोलिसांनी सातजणांविरुद्ध भादंवि कलम ३०७ आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे करीत आहेत.
फिर्यादी शहाजी माने, सिद्धेश्वर माने, पांडुरंग दिघे, गणेश दिघे, धनाजी माने, प्रशांत गायकवाड, शहाजी भोसले, प्रकाश भोसले, ज्योतीराम दिघे हे गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गप्पा मारीत थांबले होते. शहाजी माने हा त्याच्या एमएच ४५ / एआर १४८२ या दुचाकीच्या सीटवर बसला होता. त्यावेळी त्यांच्यासमोरून दोन चारचाकीने दोन वेळा फेऱ्या मारल्या. नंतर दोन्हीही कार भरधाव वेगाने येऊन त्यांच्याजवळ थांबल्या. त्यावेळी एमएच ४५ एन ७३९६ या कारमधील चालक हर्षवर्धन पाटील (रा. पाटील वस्ती, सांगोला) यांनी शहाजी माने यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने तो खाली पडला.