28.2 C
Latur
Friday, September 17, 2021
Homeसोलापूरबार्शीत मराठा आरक्षणासाठी युवकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

बार्शीत मराठा आरक्षणासाठी युवकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

बंदलाही भरभरून प्रतिसाद,आमदार राऊत यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन.

एकमत ऑनलाईन

बार्शी (प्रतिनिधी):बार्शी तालुक्यात व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच बंदला स्वयंस्फूर्तिने पाठिंबा दिला.मुख्य बाजारपेठेसह छोटी-मोठीही दुकाने बंद ठेवण्यात आली होती.त्यामुळे बाजारपठेत सगळीकडे शुकशुकाट होता.सकल मराठा समाजाच्यावतीने प्रत्येकाच्या घरावर ‘ भगवा झेंडा ‘ या मोहिमेत हरएक बांधवाने सहभाग घेऊन मराठा आरक्षणाची मागणी केली.

तर दुसरी शिवराज्य सेनेचे अध्यक्ष ॲड.हर्षवर्धन पाटील यांनी शिवाजी नगर,पंचायत समिती समोरील टाकीवर चढून एक मराठा लाख मराठा,मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,या घोषणा देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पाटील यांनी हातात भगवा झेंडा,गळ्यात बॅनर,अडकवून केंद्र आणि राज्य शासनाने लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी केली अन्यथा येणाऱ्या काळात मराठा समाज अधिक तीव्र होऊन आंदोलन करेल असा इशाराही दिला.

तर दुसरीकडे आमदार राजेंद्र राऊत यांच्याघरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा आणि मनोगत व्यक्त केले.यावेळी सध्या काढलेली पोलिस भरती जोपर्यंत मराठा आरक्षणावरची स्थगिती उठत नाही तोपर्यंत काढू नये.इतर सरकारी भरत्याही स्थगिती उठेपर्यंत थांबवण्यात याव्या.आक्रोशाचा उद्रेक होण्यागोदर मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन आरक्षण देण्याची मागणी यावेळी विविध आंदोलकांनी केली.

तसेच आमदार राऊत यांनीही मराठा आरक्षणासाठी विधानसभेत बाजू लावून धरण्याचीही मागणी करण्यात आली.यावेळी आमदार राऊत यांनी बोलताना ९ सप्टेंबर ही तारीख मराठा समाजासाठी काळा दिवस असल्याचे सांगितले.मी स्वतःला आमदार न समजता मराठा समाजाचा सेवक म्हणून काम करतो.वयाच्या ११ व्या वर्षी मी मराठा महासंघाचा कार्यकर्ता होतो.मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचे सांगून मराठा आरक्षणास व आंदोलनास जाहीर पाठिंबाही त्यांनी यावेळी दिला.यावेळी उपस्थित आंदोलकांनी हलगी वाजवत,आसूढ ओढून आंदोलन केले.त्यानंतर आमदार राऊत यांना मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

मराठा आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करु नये-प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या