Tuesday, September 26, 2023

तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात वाळू तस्करांचा उच्छाद सुरूच आहे. गुरुवारी तर वाळू तस्करांनी कळसच गाठला. सांगोला जँकवेल परिसरात भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी तहसीलदार वैशाली वाघमारे गेल्या होत्या. त्या कारवाई करणार इतक्यात वाळू चोरट्यांनी तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

एवढंच नाही तर पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केला आहे. ही घटना 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सांगोला जँकवेल परिसर घडली आहे. तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्यासह तलाठी मुसा मुजावर, कैलास भुसिंगे व प्रशांत शिंदे यांच्यासह अवैद्य वाळू उपसा व वाहतूक होत असलेल्या भीमा नदी पात्रातील जॅकवेल परिसरात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर व त्यांचे ताब्यातील वाहनांवर देखील बिगर नंबरची वाहने घालून दुखापत करण्याच व जिवाला धोका होईल, असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

या प्रकरणी वाळू तस्कर आण्णा पवार, ग्यानबा धोत्र व भैय्या उर्फ प्रकाश गंगथडे यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 307, 353, 332, 379, 506, 34 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9 व 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली आहे.

Read More  परभणी : शेतक-यांना तात्काळ कर्ज पुरवठा करण्याची मागणी

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या