23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसोलापूरमानसिक दडपणातून तरूणाचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न

मानसिक दडपणातून तरूणाचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

सोलापूर : विजापूर नाका परिसरातील २२ वर्षीय तरुण आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला गेला. त्यावेळी तिच्या वडिलांनी त्या दोघांना पाहिले, त्यातच, ती मुलगी मागील दोन ते तीन दिवसांपासून घरातून न सांगता निघून गेली. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तरुणाची विचारपूस केली. यामुळे मानसिक दडपणातून तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सध्या त्या तरुणावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या तरुणाची ओळख काही दिवसांपूर्वी आपल्या पोलिस भरतीच्या क्लासमधील मुलीशी झाली .काही दिवसांपूर्वी आपल्या दुचाकीवर बसवून तिला घरी सोडण्यासाठी जाताना, तिच्या वडिलांनी त्या दोघांना पाहिले.

ती तरुणी काही दिवसांपासून घरातून न सांगता निघून गेली. यामुळे तिच्या वडिलांनी शोध घेत तरुणाला गाठले. ही घटना पोलिस भरती क्लास चालकाच्या कानावर घातली. त्यामुळे क्लास चालकानेही तरुणाची विचारपूस केली. यामुळे तो तरुण मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होता.

तो तरुण बुधवारी रात्री घरातून निघून गेला. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेटे वस्तीजवळील रेल्वे ब्रीजजवळ आपण आत्महत्या करत आहोत अशी माहीती फोनवरून कुटुंबीयांना दिली. कुटुंबीय रात्री एक वाजता शेटे वसती रेल्वे ब्रिज परिसरात गेले. त्यावेळी तो गंभीर जखमी अवस्थेत होता. त्याला तेथून उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. सध्या उपचार सुरू असून, त्याची तब्येत सुधारत असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या