29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeक्राइमपोलिसांत तक्रार केल्याचा संशयावरून पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न; कोळेगावातील घटनेत दोघांविरुद्ध...

पोलिसांत तक्रार केल्याचा संशयावरून पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न; कोळेगावातील घटनेत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

सोलापूर: माळशिरस तालुक्यातील कोळेगा व येथेपोलिसांकडे तक्रार केल्याच्या संशयावरून एकाला काठीने बेदम मारहाण करून अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सुनील शंकर जाधव(वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविराज सुखदेव कांबळे_कोळी(३०) व राहुल सुखदेव कांबळे _कोळी ( २८, कोळेगाव) या दोघांविरुद्ध वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोळेगाव ते भाळवणी रस्त्यावरील पारसे वस्तीजवळ फिर्यादीच्या गावातील रविराज व राहुल या दोघांनी फिर्यादीची मोटारसायकल अडवली आणि त्यांना तू पंच होतो, तंटामुक्त अध्यक्षाचा भाऊ आहे काय, फार पुढे पुढे करतो, आमची पोलिसांकडे तक्रार करतो काय अशी विचारणा करत फिर्यादीस काठीने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून काडीने पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी तेथून पळून पारसे यांच्या घरातील बाथरुममध्ये गेल्याने जीव वाचला. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या