33.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home सोलापूर एफ आर पी थकवणार्‍या कारखान्यांचा लिलाव करून शेतकर्‍यांची बीले द्या - देशमुख

एफ आर पी थकवणार्‍या कारखान्यांचा लिलाव करून शेतकर्‍यांची बीले द्या – देशमुख

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल साखर कारखाना,सितामाई कारखाना, संत शिरोमणी कारखाना, मोहोळ तालुक्यातील भीमा साखर कारखाना या कारखान्यांवर आरआरसी कारवाईचा आदेश साखर आयुक्तांनी दीला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी तहसीलदारांनी करून कारखान्यांचा लीलाव करून शेतकर्‍यांची थकीत बीले द्यावीत या व अन्य मागण्यांसाठी जनहीत शेतकरी संघटनेने पंढरपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या कारखान्यांनी ऊसदर नियंत्रण कायदा पायदळी तुडवत शेतकर्‍यांना एफआरपी दीलेला नाही.या कारखान्याच्या संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत.या कारखानदारांनी दोन वर्षांपासून शेतकर्‍यांचा एफआरपी थकवलेला आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईचे आश्वासन देऊनही आजपर्यंत या कारखान्यांवर कारवाई झालेली नाही.या कारखान्यांवर तातडीने आरआरसी कारवाई व्हावी आणी शेतकर्‍यांचे थकीत बील देण्यात यावे.मागण्या पुर्ण न झाल्यास १ ऑक्टोबरनंतर जिल्ह्याधिकाऱ्यांची गाडी संघटनेच्या वतीने अडवण्यात येईल व जिल्हाधिकार्‍यांना जिल्ह्यात फीरू देणार नाही असा ईशारा संघटनेतर्फे तहसिलदारांना दीलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

डबघाईला आलेल्या पथविक्रेत्यांच्या मदतीला सरसावली सांगोला नगरपालिका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या