30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home सोलापूर उजनी कालव्यात बाप लेकीचा बूडून मृत्यू

उजनी कालव्यात बाप लेकीचा बूडून मृत्यू

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील माळेगाव येथे पाण्याने भरलेल्या उजनी धरणाच्या डाव्या कॅनॉलमध्ये छोटा हत्ती हे वाहन पडून झालेल्या दुर्घटनेत बाप-लेकीचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजता माणिक लोकरे यांच्या शेताजवळ घडली आहे. उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. जवळपास अर्धा कॅनॉल पाण्याने भरून वाहत आहे.

अशा परिस्थितीत माळेगाव (ता. माढा,जि.सोलापूर) येथे राहणारे तात्यासाहेब बाळासाहेब कोळी (माने) (वय.२८) वर्ष रा. मिटकलवाडी हे आपल्या सात वर्षाच्या कुमारी आरती तात्यासाहेब कोळी (वय.७) रा. मिटकलवाडी ता.माढा नावाच्या मुलीसह छोटाहत्ती हे वाहन नं एम. एच. ४५. टी.-०३१२ यामध्ये मकवान भरून माळेगाव मिटकलवाडी कॅनॉल पट्टीने त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती बरघाव वेगाने चालवून रोडची परिस्थिती न पाहता अविचाराने चालवून त्यांचे वाहन पाण्याने वाहत्या कॅनॉलमध्ये पडले. या वाहनातून त्यांना लवकर बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडालेल्या वाहनातच गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर सगळीकडे ही खबर वा-यासारखी पसरली. तेव्हा घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. काही गावकरी व शेतक-यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढले.

सरकार अडले, शेतकरी नडले!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या