सोलापूरः मंडळ अधिकारी यांच्या समवेत संगनमत करून बनावट जबाब, खोट्या रेकॉर्डच्या आधारे फटाक्याच्या कारखान्याचा परवाना घेऊन फसवल्याप्रकरणी मालकास बार्शी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
सुरेश साहेबराव ताकतोडे ( वय ३२, रा. माढा, जि. सोलापूर) असे अटकपूर्व जामीन झालेल्याचे नाव आहे. राजाबाई महादेव थोरात (वय ६०, रा. लऊळ, ता. माढा) या सुरेश ताकतोडे यांच्या कारखान्याच्या बाजूला राहतात. दि.१६ मे २००८ रोजी मंडळ अधिकारी यांच्या सोबत मिळून संमतीचा खोटा जबाब तयार केला.
अंगठा लावून खोटे रेकॉर्ड तयार करून फटाक्याच्या कारखान्याचा परवाना घेतला. ही बाब लक्षात .
आल्यानंतर त्यांनी माढा येथील दिवाणी न्यायालयात २०२१ मध्ये खासगी फिर्याद दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने कुर्डुवाडी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आरोपीचे वकील अॅड. सचिन इंगळगी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.