24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeसोलापूरएका गुन्ह्यात जामीन, दुसर्‍यात अटक

एका गुन्ह्यात जामीन, दुसर्‍यात अटक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : चोरीस गेलेल्या मोटारसायकली शोधण्यासाठी तब्बल ६५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासून २७ मोटारसायकल मालकांनी गुन्हे दाखल केल्यावर २७ गुन्हे दाखल करून, २९ मोटारसायकली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली. वेळोवेळी पोलीस कोठडी मिळाली. शेवटी जामीन मिळाला. मात्र, लागलीच पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यासाठी पोलिसांनी पत्र देताच, न्यायालयाने त्यांना पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला.

२९ मोटारसायकली चोरीच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने मच्छिंद्र भागवत जाडकर, सचिन जालिंदर चव्हाण (दोघे रा. मोडनिंब) व दत्तात्रय रावसाहेब शेळके (रा.अरण ता.माढा) यांना अटक केली होती. त्यानी गुन्हा कबूल करून सचिन चव्हाण दत्तात्रय शेळके हे साथीदार असल्याचे कबूल केले होते. आरोपींपैकी दोन शेतकरी तर एक व्यापारी होता पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ८ लाख ४५ हजार किमतीच्या २९ गाड्या जप्त करून दोघांना न्यायालयासमोर हजर केले होते.

पोलीस कोठडी शेवटी न्यायाधीश वराडे आरोपींना जामीन मंजूर केला. मात्र दुसऱ्या गुन्ह्यासाठी ताब्यात द्यावे, म्हणून पोलिसांनी पत्र दिल्यावर न्यायालयाने पुन्हा त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले यात आरोपीतर्फे अ‍ॅड. बाबासाहेब जाधव अ‍ॅड. श्रीकांत गडदे, अ‍ॅड. सारिक सारंगमठ, तर सरकारतर्फे अ‍ॅड. देवमानेन यांनी काम पाहिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या