28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeसोलापूरलाचखोर अधिकारी किरण लोहार यांना जामीन

लाचखोर अधिकारी किरण लोहार यांना जामीन

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. लाच प्रकरणात सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून किरण लोहार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर किरण लोहार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

राज्य शासनाने किरण लोहार यांना निलंबित केल्यानंतर सोलापूर न्यायालयाचा लोहार यांना काहीसा दिलासा दिला आहे. गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वात आलेला असून साक्षीदारांवर दबाव आणण्याचा कोणताही प्रश्न येत नाही, तसेच आरोपी हा कोठेही पळून जाणार नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. हा युक्तिवाद ग्रा धरून न्यायाधीशांनी २०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर लोहार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या यु-डायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. ३१ ऑक्टोबर रोजी किरण लोहार यांना २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या