30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeसोलापूरसोलापूर शहर जिल्ह्यात बंदला प्रतिसाद

सोलापूर शहर जिल्ह्यात बंदला प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख बाजारपेठा उघडल्या नाहीत. एसटीबस वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रस्त्यावर तुरळक वाहतुक सुरू होती. बँका व सहकारी कार्यालयात नेहमीप्रमाणे लगबग होती. मंगळवारी दुपारी दत्तनगर येथून माकपच्या वतीने निघालेला मोर्चा त्यानंतर मोर्चेकरांनी अक्कलकोटरोड ते अशोक चौक रस्त्यावर मांडलेला ठिय्या यानंतर पोलिसांनी आक्रमक होत कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद देत ताब्यात घेतलं.

भारत बंदमुळे अनेक मार्गावरील बससेवा बंद ठेवली होती. सकाळपासून शहरातील चौका चौकात पोलिसांनी गस्त वाढविली होती. सकाळी १० च्या सुमारास महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी बाजारपेठेत फेरी मारली व लोकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत दुकाने, बाजारपेठ बंद झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे प्रमुख पदाधिकारी बंदचे आवाहन करित एकत्रितरित्या फिरत होते. शहरातील तसेच सोलापूरच्या परिसरात असलेल्या एमआयडीसीमध्ये उद्योग व्यवसाय बंद होते.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात भाजीपाल्याची काही प्रमाणात आवक झाली मात्र फळ व धान्याचे आडत व्यवहार बंद होते. बाजारपेठेत शुकशुकाट होता. शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते तर जिल्ह्यात अक्कलकोट, मंगळवेढ, बार्शी, करमाळा, पंढरपूर इथेही बंदला प्रतिसाद मिळाला. पंढरपूरात शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रित मोर्चा काढला. महामार्गावर घोषणा देण्यात आल्या मात्र पोलिसांनी वाहतुक सुरळीत राहील या दृष्टीने मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बंद शांततेत सुरूहोता. केंद्र सरकार विरोधात पुकारलेल्या भारत बंदला सोलापुरात वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देत प्रशासनाला कांदा व भाजी भेट देण्याचे आंदोलन आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वात केले.

पंढरपुरात राजकीय पक्षांसह शेतकरी संघटना आक्रमक
शेतक-यांनी कृषी विधेयकाविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पंढरपुरातील शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याने पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना,बळीराजा शेतकरी संघटना,वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत भारत बंदला पाठिंबा दिला. यावेळी मोदी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.

यावेळी केंद्र सरकारने नव्याने केलेल्या कृषी कायद्या विरोधात पंढरपुरातील शेतकर्यांनी आक्रमक होत आक्रोश व्यक्त केला. मोदी सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करत. सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. नवे कायदे शेतकर्याना उद्योगपतीच्या दावणीला बांधणारे आहेत.असे कायदे करून सरकारने शेतक-यांना वार्यावर सोडल्याच्या भावना यावेळी व्यक्त होत होत्या.

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद, ग्रामीण भागात कडेकोट बंद !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या