23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeसोलापूरबापू, महाराष्ट्र मनोरंजन दौरा बंद करा; शिवसेनेचा शहाजी पाटलांना सल्ला

बापू, महाराष्ट्र मनोरंजन दौरा बंद करा; शिवसेनेचा शहाजी पाटलांना सल्ला

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : युवासेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख गणेश इंगोले यांनी सोशल मीडियातून आमदार पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा.

काय दारू..क़ाय चकणा.. काय ते ५० खोके समदे कसे ओके….. बापू तुमच्यासाठी ‘मातोश्री’वर नोकरी भेटेल..आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करू, टक्केवारी घेऊन आधी स्वत:चं घर पूर्ण करा. स्वत:च्या बायकोला ५० खोक्यांतून साडी घेऊन द्या, अशी बोचरी टीका करणा-या पोस्ट सोशल मीडियात युवासेनेच्या पदाधिका-यांनी शेअर केल्या आहेत.

दरम्यान काय झाडी, काय डोंगर.. या डायलॉगवरून प्रसिद्ध झालेल्या शहाजी पाटलांवर शिवसेनेच्या पदाधिका-याने अक्षरश: झोंबणारी टीका केली आहे. बापू मतदारसंघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा.क़ाय दारू.क़ाय चकणा.. काय ते ५० खोके समदे कसे ओके… आहे तर आधी याच खोक्यातून बायकोसाठी साडी घेऊन या असा सल्ला पदाधिका-याने दिला आहे. पंढरपूरमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोले यांनी सोशल मीडियातून शहाजी बापू पाटलांना हे प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडियात त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर काय झाडी, काय डोंगर.. हा त्यांचा डायलॉग फेमस झाला. अनेक ठिकाणी मुलाखती झाल्या. आमदार असून निधी कमी पडतोय, खूप गरिबीत राहतोय, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यातच किती दिवस झाले, बायकोला साडीही घेऊ शकलो नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळेच पंढरपूरच्या युवासेना नेत्याने त्यांना आधी ती साडी घेऊन या असा सल्ला दिला आहे. त्यातच काल गणरायासमोर काय साकडे घातले, असे विचारले असता ‘मातोश्री’वर सुख-समृद्धी दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी, आनंदी ठेव, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी म्हटले. यावर त्यांना शिवसेनेतून प्रत्युत्तर मिळाले आहे.

पंढरपुरात शिंदेसेना-शिवसेना वाद पेटणार?
एकाच डायलॉगने प्रसिद्ध झालेले शहाजी बापू पाटील आता जणू शिंदे सेनेचे ब्रँड झालेत. त्यामुळे विविध ठिकाणी भाषण करताना ते डायलॉग तर मारतातच, शिवाय शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंवरही जोरदार टीका केली. या टीकेमुळे दुखावलेले शिवसेनेचे पदाधिकारी आता त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे सोलापूर-पंढरपुरात दोन गटातील शिवसेनेचा वाद चांगलाच उफाळून येणार असे दिसते आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या