22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeसोलापूरबार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांची कोरोनावर मात

बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांची कोरोनावर मात

एकमत ऑनलाईन

बार्शी :  बार्शी शहराचे प्रथम नागरिक असिफभाई तांबोळी यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास होत असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर त्यांचा स्वैब घेतल्यानंतर त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तांबोळी यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवली.

अधिक माहिती अशी की,तांबोळी हे नगराध्यक्ष असल्यामुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि प्रसार अटोक्यात आणण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या.तसेच लॉकडाऊनच्या काळात गरजू व्यक्तींसाठी अन्नछत्र चालविले,शहरातील ज्या भागात कोरोना रुग्ण सापडला आहे त्या कंटेंटमेंट भागाची भेट घेऊन पाहणी करणे,ग्रामीण रुग्णालयांची भेट घेऊन पहाणी करणे व आरोग्यधिकारी व डॉक्टरांची भेट घेऊन रुग्णसंख्येचा आढावा घेणे असे दैनंदिन कार्य अविरतपने चालू असल्याने मला कोरोना झाल्याची कबूली तांबोळी यांनी दिली.

कोरोना रोगाचा ंिहमतीने सामना करा आपण त्याला हरवू शकतो.प्रत्येकाने प्राशसनाच्या नियमांचे पालन केलेतर आपण कोरोनावर नक्की मात करू शकतो.यावेळी नगराध्यक्ष तांबोळी यांना गुरुवार दि. २३ जुलैला डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे येथून डिस्चार्ज देण्यात आला.

बार्शी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नगराध्यक्ष तांबोळी यांनी कोरोनावर मात केल्यामुळे सर्वसामान्य कोरोना रूग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी ही घटना सकारात्मक असल्याची भावना सर्वसामान्यामधून व्यक्त होत आहे़
यावेळी मी लवकरच पुन्हा जनतेचे सेवा करण्यासाठी ग्राऊंडवर येऊन काम करणार असल्याचे सांगितले.

Read More  संसर्ग वाढत असतांना जनतेत संशयकल्लोळ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या