Tuesday, October 3, 2023

बार्शी तालुका कोरोना संसर्गाने हादरले

सोलापूर : बार्शी तालुका कोरोना संसर्गाने हादरले असून तब्बल एका दिवसात ३६ रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. यातील ११ कोरोनाबाधित सबजेलमधील कैद्यांसह २४ जणांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवसात ५ जणांचा मृत्यू कोरोना बाधितामुळे झाल्याची नोंद जि.प. आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बार्शी शहरात सायंकाळपर्यंत बार्शी वैराग येथील ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले. एवढ्यावरच न थांबता रात्री उशिरा आलेल्या अहवालात तब्बल २४ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. यामध्ये वैराग येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सकाळी १ आणि रात्री उशिराचा अहवालात १० अशा ११ कैद्यांचा समावेश आहे. दिवसभरात २४ रुग्ण नव्याने वाढले आहेत. आता बाधितांची आजपर्यंतची संख्या ८४ झाली आहे.
रात्री उशिरा आलेल्या अहवालात बार्शी सब जेलमधील १० कैदी, माढा तालुक्यातील रिधोरे व भोसरे येथील प्रत्येकी एक, बार्शी शहर १०, वैराग ११, साकत पिंपरी २ असे एकूण ३६ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. वैराग येथील दोघांचा मृायू झाला आहे. यामुळे शहर व तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा हा ८४ झाला आहे.

सोलापूर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केलेल्या अहवालामध्ये बार्शी तालुक्यात ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. बार्शीमध्ये आढळून आलेल्या बाधितांमध्ये बार्शी सबजेलमधील ११ कैद्यांचा समावेश आहे.आजवर तालुक्यातील पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ८४ झाली आहे. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. बार्शीच्या सबजेलमधील कैद्याला जेलमध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या गार्डच्या संपर्कात आल्यामुळे लागण झाली आहे. या कैद्याला कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

तालुक्यात आजवर ८४ जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर २८ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. अद्याप २६ जणांवर कोविड केअर सेंटर व जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मसले चौधरी मोहोळ (१), रिधोरे ता. माढा १, भोसरे माढा १, एकरुख उत्तर सोलापूर १, हगलूर १, बोरगाव अक्कलकोट १, बणजगोळ १, कल्लाप्पावाडी १, दुधनी १, समता नगर अक्कलकोट १, जिंती करमाळा १, मुळेगाव तांडा ६, कुंभारी २, होटगी १, होटगी स्टेशन २, मुळेगाव २, हत्तूर २, वांगी ४, बोळकवठा २, नांदणी १, नवीन विडी घरकुल २, उळे १ अशी नोंद शुक्रवारी आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.

आतापर्यंत ४७७ कोरोनाबाधितांची संख्या झाली असून यापैकी ३०५ पुरुष, १७२ स्त्रिया आहेत. तर २४ जणांचा यापैकी मृत्यू झाला आहे. २६१ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून १९२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मार्डी येथील ८० वर्षीय पुरुष, मसले चौधरी येथील ४६ वर्षीय पुरुष, आष्टी येथील ७२ वर्षीय वृद्धा, परिट गल्ली वैराग येथील ८५ वर्षीय पुरुष, गवंडी गल्ली वैराग येथील ६० वर्षीय पुरुष या ५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अक्कलकोट ८४ (मृत ७), बार्शी ८१ (मृत ५), करमाळा ४, माढा ११ (मृत १), माळशिरस ५, मोहोळ २५ (मृत ३), उत्तर सोलापूर ४७, पंढरपूर २१, सांगोला ३ (मृत १), दक्षिण सोलापूर १९६ (मृत ५) अशी नोंद करण्यात आली आहे.

Red More  कोरोना संदर्भात अफवा पसरवल्यास होतील गंभीर परिणाम

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या