28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeसोलापूरऐन सणात पाण्यासाठी बार्शीकर उतरले रस्त्यावर

ऐन सणात पाण्यासाठी बार्शीकर उतरले रस्त्यावर

एकमत ऑनलाईन

बार्शी : सोलापूर रोड येथे गेल्या अनेक महिन्यापासून विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ ऐन गौरी गणपती पाण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून नगरपालिका प्रशासन व अधिका-यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी सोलापूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

यावेळी सोलापूर रोड येथील बगले चाळ, मुळे प्लॉट, सावळे चाळ परिसरात पाणी विस्कळीत होण्याची वारंवार समस्या होत असून याकडे प्रशासन डोळेझाक करत आहे. पाणी गदूळ व जंतू मिश्रीत येत असल्याने येथील पाणी पिण्यायोग्य नसल्याने होत आहे. येथील वॉल ओपनर उदटपणे बोलत असल्याच्या तक्रारी माहिलांनी यावेळी केल्या. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या तरी आहे. तसेच या भागातील शाळा नं.८ नजीक अनेक महिन्यांपासून वॉलसह पाईपलाईन लिकेज आहे यामुळे जंतु मिश्रीत पाणी येत आहे.अद्यापही येथील लिकेज बंद केले नाही.

आमची दखल घेतली जात नसल्याने आम्हाला गौरी गणपती सण सोडून नगरपालिकेमुळे आंदोलन करावे लागत आहे. लिकेज आठ दिवसात काढली नाही तर हा रोष अधिक प्रमाणात नगरपालिकेला पहावयास मिळेल, असा इशारा यावेळी महिलांनी दिला.दरम्यान, सोलापूर रोड येथे आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजुने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पो.नि. मांजरे यांनी आंदोलनस्थळी भेट देवून वाहतूक सुरळीत करत आंदोलनकर्ते व पाणीपुरवठा अधिकारी अजय होनखांचे यांच्यात चर्चा घडवून आणली.

विस्कळीत आणि अस्वच्छ पाणीपुरवठा विरोधात बार्शीकरांनी ऐन सणादिवशी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या